AIDS : मागील दहा वर्षात १७ लाखांपेक्षा जास्त लोकांना एड्सची लागण

AIDS : मागील दहा वर्षात १७ लाखांपेक्षा जास्त लोकांना एड्सची लागण
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मागील  दहा वर्षांमध्‍ये १७ लाखांपेक्षा जास्त लोकांना एड्सची (AIDS) लागण झाली असल्याचे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेशमधील चंद्रशेखर गौर यांनी 'आरटीआय'च्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती विचारली होती. वर्ष २०११-१२ मध्ये असुरक्षित लैंगिक संबंधातून २.४ लाख लोकांना एड्सची लागण झाली होती. त्या तुलनेत वर्ष २०२०-२१ मध्ये हा आकडा ८५ हजार २६८ इतका होता. थोडक्यात एड्सची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे आकडेवारीवरून स्‍पष्‍ट हाेत आहे.

दहा वर्षांच्या कालावधीत आंध्र प्रदेशात सर्वाधिक ३ लाख १८ हजार ८१४ लोकांना एड्सची (AIDS) लागण झाली. त्या पाठोपाठ राज्‍य कंसात आढलेली रुग्‍णसंख्‍या  महाराष्ट्र ( २ लाख ८४ हजार ५७७) , कर्नाटक ( २ लाख १२ हजार ९८२), तामिळनाडू ( १ लाख १६ हजार ५३६ ) , उत्तर प्रदेश ( १ लाख १० हजार ९११ ), गुजरात ( ८७ हजार ४४०).

सर्व राज्‍यांमध्‍ये एड्स संक्रमणात घट

दहा वर्षात रक्त संक्रमणाच्या माध्यमातून १५ हजार ७८२ लोकांना एड्स झाला.४ हजार ४२३ मुलांना त्यांच्या मातेच्या माध्यमातून या रोगाची लागण झाली असल्याचेही राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एचआयव्ही संक्रमणात घट झाली आहे. सन २०२० पर्यंत देशात ८१ हजार ४३० मुलांसहित एड्सचे २३ लाख १८ हजार ७३७ रुग्ण होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news