पुढारी ऑनलाइन डेस्क : Hiroshima-Nagasaki : जपानसाठी ऑगस्ट महिना अनेक कटू आठवणींचा महिना आहे. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 हे दोन दिवस जपानच नव्हे तर जगाच्या इतिहासातील महा संहारक मानले जाते. या दिवशी अमेरिकेने लागोपाठ दोन अण्वस्त्र हल्ले केले होते. ज्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. नंतर रेडिएशनच्या प्रभावाने अनेक जण विविध आजारांनी ग्रासले. इतकेच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांनीही अनुवांशिक आजार झाले. मात्र, या हल्ल्यातून काही जण आकस्मिकपणे आश्चर्यकारकरित्या बचावले. मात्र काही व्यक्ती अशा आहेत ज्यांनी हे दोन्ही अण्वस्त्र हल्ले झेलले आणि त्यातूनही विस्मयकारकरित्या बचावले त्यापैकी एक 'सुटोमु यामागुची!'
सुटोमु यामागुची हे नागासाकीचे राहणारे होते. ते मित्सुबिशी हैवी इंडस्ट्रीजसाठी तीन महिन्यांपासून हिरोशिमात कार्य करत होते. 5 ऑगस्टला त्यांना सांगण्यात आले की त्यांचे हिरोशिमातील कार्य संपले असून ते नागासाकी येथे आपल्या घरी जाऊ शकतात. नागासाकी येथे कंपनीचे मूळ ऑफिस देखील होते.
कंपनीच्या ऑर्डरप्रमाणे यामागुची 6 ऑगस्टला सकाळी आपल्या दोन साथीदारांसोबत हिरोशिमा रेल्वे स्टेशनला निघाले. त्यावेळी त्यांना आठवले की त्यांचे थोडे सामान ते विसरले म्हणून ते पुन्हा मागे फिरले. त्यावेळी साधारण सकाळचे सव्वा आठ वाजले होते. त्यावेळी त्यांनी अमेरिकेचे बी 29 बॉम्ब टाकणाऱ्या विमानाला शहराच्या वर उडताना पाहिले. त्यावेळी त्याने विमानातून एक छोटी वस्तू पैराशूट सोबत पडत असल्याची पाहिले.
अचानक आभाळातून डोळे दीपवणारा प्रकाश पसरला आणि मग अचानक एक बधिर करणारा स्फोट झाला. स्फोटाबरोबर, एक तुफान निर्माण झाला आणि यामागुची जवळच्या बटाट्याच्या शेतात पडला. त्यावेळी तो ग्राउंड शून्यापासून तीन किमीपेक्षा कमी होता.
यामागुचीने एका मुलाखतीत सांगितले की, मला माहित नाही की काय झाले. मी बेशुद्ध झालो होतो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा सर्वत्र अंधकार होता मला खूप काही दिसत नव्हतो. सर्वत्र राख पडत होती. त्याने ते घेरले गेले होते. त्याने आपले पाय हलवून पाहिले नंतर हळूहळू आपल्या शरीराची हालचाल केली तेव्हा त्यांना विश्वास झाला की ते जीवंत आहेत. त्यांचा चेहरा हात होरपळले होते. दोन्ही कानांचे पडदे फाटले होते. त्यांना शरीराच्या डाव्या अंगात प्रचंड उकडत होते. त्यांना उलटी करावीशी वाटत होती आणि पुन्हा बेशुद्ध पडणार की काय असे झाले होते.
तेव्हा त्यांना काही लांब अंतरावर एक झाड दिसले ज्याची सर्व पाने गळाली होती. यामागुचीने आपल्या शरीरातील संपूर्ण ताकद लावून त्या झाडा जवळ पोहोचले. थोडावेळ ते त्या झाडाखाली बसले. तहानेने प्रचंड व्याकूळ झाले होते. एखाद्या सिनेमाहॉलमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वीचे फीलिंग होते. जिथे रिकामी फ्रेम कोणत्याही आवाजाशिवाय चमकत होती. परमाणू बॉम्बच्या हल्ल्याने सर्वत्र भरदिवसा देखील सायंकाळ वाटत होती. जवळपास 3000 फूट इतक्या उंचीपर्यंत पांढरा धूर निघत होता.
या हल्ल्यात संपूर्ण शहर जवळपास बेचिराख झाले होते. नजर जाईल तिथपर्यंत मृतदेहांचा खच पडला होता. या हल्ल्यात जवळपास 80,000 लोक मारले गेले होते. नंतर रेडिएशनमुळे एकूण 1 लाख 40 हजार लोक मारले गेले. यामागुची कसेबसे मित्सुबिशी शिपयार्डच्या जवळ पोहोचले. तिथे त्यांचे दोन साथी अकीरा इवानागा आणि कुनियोशी सातो हे भेटले. ते देखील या परमाणू हल्ल्यातून बचावले होते. त्या दोघांसोबत त्यांनी एका कँपमध्ये आश्रय घेतला.
त्यांना कळाले की रेल्वे कशाबशा पद्धतीने अजून सुरू आहे. म्हणून ते आपल्या सकाळी रेल्वे स्टेशनला पोहोचले. यावेळी त्यांना जवळपास मृतदेहांची एक नदीच ओलांडावी लागली. स्टेशनवर हिरोशिमा स्फोटात बचावलेले हतबल लोक पोहोचले होते. ते लोकही मोठ्या प्रमाणात जळाले होते. होरपळले होते. त्या ट्रेनने ते नागासाकीला एक रात्र प्रवास करून पोहोचले.
यामागुची यांचा चेहरा इतका जळाला होता की त्यांना कोणीही ओळखू शकत नव्हते. नागासाकीला पोहोचताच ते सरळ रुग्णालयात गेले. डॉक्टर त्यांचे मित्र होते त्यांना यामागुची ओळखू आले नाहीत. यामागुचीचे फक्त डोळे उघडे होते. बाकी संपूर्ण चेहरा आणि निम्मे शरीर बँडेज पट्ट्यांनी बांधलेले होते. एव्हाना त्यांना ताप आला होता. घरी पोहोटले तर आईने त्यांना भूत समजून ती घाबरली.
यामागुची 9 ऑगस्टला आपल्या ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे त्यांच्या बॉसने त्यांना हिरोशिमाचा रिपोर्ट मागितला. ते सकाळी 11.00 वाजता कंपनीच्या डायरेक्टरला हिरोशिमात काय घडले याचा वृत्तांत सांगत होते. मात्र, बॉसला विश्वास बसत नव्हता की फक्त एक बॉम्ब संपूर्ण शहराचा कसा विध्वंस करू शकतो. त्याने विचारले की तुला वेड लागले आहे का असे कसे घडू शकते. कारण तो पर्यंत परमाणू बॉम्ब विषयी कोणालाही माहित नव्हते.
यामागुची त्यांच्या बॉसला समजावून सांगत होते इतक्यात दुसरा परमाणू धमाका झाला. याही वेळी तेच डोळे दीपवणारा प्रकाश वादळी वाऱ्यासारखा उठलेला ढग क्षणार्धात ऑफिसच्या खिडक्या दारं तुटतात आणि यामागुची लांब जमिनीवर जाऊन पडला.
हा क्षण जेव्हा यामागुचीला आठवतो तेव्हा त्यांना वाटते की तो अवाढव्य मशरूम सारखा ढग हिरोशिमावरून माझा पाठलाग करत आहे आणि तो इथेही पोहोचला.
आपल्याकडे म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी? या अण्वस्त्र हल्ल्यातही यामागुची आश्चर्यकारकपणे जीवंत राहिले. नागासाकीवर जो दुसरा अण्वस्त्र हल्ला अमेरिकेने केला होता. तो बॉम्ब हिरोशिमा पेक्षा देखील जास्त संहारक होता. मात्र, यामागुची यांचे ऑफिस पहाडी भागात होते. त्यामुळे त्याला जास्त नुकसान पोहोचले नाही. जिथे बॉम्ब पडला होता त्या भागापासून हा भाग 3 किमी लांब होता. यामागुची याच्या अंगावर बांधलेल्या सर्व पट्ट्या उडून गेल्या. तरीही ते जीवंत राहिले. तीन किलोमीटर लांब असल्याने त्यांचा जीव वाचला.
यामागुचीला जेव्हा ते जीवंत आहेत असा विश्वास वाटला. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची आठवण आली. ते त्यांच्या चिंतेने घरी पळाले. घराची एक बाजू पूर्ण कोसळली होती. सर्वत्र मलबा होता. मात्र त्यांचे कुटुंब एका सुरुंगात लपल्याने ते सुखरूप राहिले. त्यांना थोड्याशाच जखमा झाल्या. यामागुचीच्या आयुष्यातील हे दिवस आणि हे क्षण खूपच विस्मयकारक आश्चर्यजनक होते. ज्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
यामागुची बचावले मात्र नंतर रेडिएशनमुळे त्यांना अनेक आजार जडले. त्यांचे केस झडले. हातांना गँगरीन झाला. सातत्याने उलट्या होत होत्या. अखेर 15 ऑगस्टला जपानने रेडिओ संदेश जारी करून सरेंडरची घोषणा केली. त्यावेळी ते आपल्या कुटुंबियांसोबत एका बॉम्ब शेल्टरमध्ये होते. दरम्यान या घोषणेमुळे त्यांना ना आनंद झाले ना दुःख. त्यांना कोणत्या संवेदनाच होत नव्हत्या. तसेच ते त्यावेळी तापाने लढत होते. ते मोठ्या मुश्किलीने द्रव पदार्थ खाऊ शकत होते.
रेडिएशच्या परिणामातून यामागुची हळूहळू बरे झाले. मात्र त्यांचा मुलगा कँसरने मरण पावला. नंतर 5 वर्षांनी त्यांना आणखी दोन मुली झाल्या. एव्हाना ते एक कवि बनले होते आणि हिरोशिमा नागासाकीच्या वाईट आठवणींना विसरण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेच्या वेळी त्यांचे वय 29 वर्षाचे होते. नंतर वर्ष 2000 पासून त्यांनी त्यांचा अनुभव सार्वजनिक मंचांवर सांगितला. तसेच अण्वस्त्रा विरोधी आंदोलनात ते सहभागी झाले. 2006 मध्ये त्यांनी न्यूयॉर्क आणि संयुक्त राष्ट्रांसमक्ष अण्वस्त्र निरस्त्रीकरण विषयी भाषण दिले.
हिरोशिमा आणि नागासाकी या दोन्ही शहरातील दोन परमाणू हल्ल्यांचा अनुभव घेतला असे 165 लोग होते. मात्र, यामागुची यांना जपान सरकारने अधिकृत रित्या निज्यू हिबाकुशा अर्थात दोन परमाणू हल्ल्यांना झेलणाऱ्या व्यक्तीच्या रुपात मान्यता दिली. 2009 मध्ये जपान सरकारने त्यांना हा सन्मान दिला. त्यानंतर एक वर्षानंतर वयाच्या 93 व्या वर्षी यामागुची यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा :