Earthquake
Earthquake

हिंगोली : कळमनुरी येथे भूकंपाचे धक्के ; नागरिक भयभीत

Published on

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा : रुद्रवाडी तालुक्यातील कळमनुरी येथे आज (दि ११) दुपारी १२.२५ च्या सुमारास भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे भीतीने नागरिक घराबाहेर पडले. दरम्यान, रुद्रवाडी परिसरातील पोत्रा, सिदगी, वापटी, कुप्ती, पिंपळदरी या गावांमध्ये चार – सहा महिन्यांनी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुपटी वापटी येथे असल्याचे सांगितले जात आहे.

या गावांना नेहमीच भूकंपाचे झटके जाणवत असतात.  आज रुद्र वाडी येथे एकापाठोपाठ भूकंपाचे इ सौम्य झटके बसल्याने जमीन हादरली.  घरावरील पत्रे धक्क्यामुळे वाजू लागले. गावकऱ्यांना भूकंपाच्या धक्क्यांची जाणीव होताच ते घराबाहेर पडले. दरम्यान, याबाबत शासकीय यंत्रणेकडून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचलंत का ? 

logo
Pudhari News
pudhari.news