हिंगोली : जेवणाला का उशीर केला म्हणत ८० वर्षीय म्हाताऱ्याने वृद्ध बायकोला जिवंत जाळले

हिंगोली : जेवणाला का उशीर केला म्हणत ८० वर्षीय म्हाताऱ्याने वृद्ध बायकोला जिवंत जाळले

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सवना (जि. हिंगोली) येथे स्वयंपाक उशिरा का केला या कारणावरून कुंडलिक शिवराम नायक या 80 वर्षाच्या पतीने 78 वर्षाच्या पत्नीला हात-पाय बांधून जिवंत जाळले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव तालुक्यातील सवना येथे कुंडलिक शिवराम नायक व त्यांची पत्नी सुंदराबाई कुंडलिक नायक हे दोघे राहतात.  दरम्यान, शुक्रवारी दुपारी स्वयंपाक उशिरा का केला या कारणावरुन कुंडलिक यांनी त्याची पत्नी सुंदराबाई यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने सुंदराबाई यांचे हातपाय बांधून त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच सुंदराबाई यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील रूग्‍णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्यू झाला.

पोलिसांना माहिती मिळताच त्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी जरिता वाघ यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी कुंडलिक नायक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news