पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Ghulam Nabi azad) व्हिडिओमध्ये आझाद म्हणताना दिसताहेत की, इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला होता. भारतात कोणीही बाहेरचा व्यक्ती नाही. आम्ही सर्व या देशाचे आहोत. भारताचे मुसलमान मूळ रूपाने हिंदू होते. नंतर ते धर्मांतरीत झाले आहेत. (Ghulam Nabi azad)
हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना आहे. सर्व मुसलमान आधी हिंदू होते. आमच्या देशात मुसलमान हे धर्मांतर केल्यानंतर झाले आहेत. काश्मीरमध्ये कश्मीरी पंडित हे धर्मांतरित झाल्यानंतर मुसलमान झाले आहेत. सर्वांचा जन्म हिंदू धर्मातच झाला होता.
गुलाम नबी आझाद यांचा हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. गुलाम नबी आझाद यांनी डोडातील चिरल्ला गावात एका सरकारी शाळेत ९ ऑगस्ट रोजी आयोजित सभेला संबोधित करत म्हटलं होतं, काश्मीरी मुसलमान हे काश्मिरी पंडितांकडून मुस्लिममध्ये धर्मांतरीत झाले. येथे इस्लामपूर्वी हिंदू धर्म होता.
गुलाम नबी आझाद म्हणाले, भारतात इस्लाम १५०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आला होता. तर हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना आहे. १०-२० मुसलमान असतील जे मुघल सेनेचे सैनिक असतील आणि भारतात आले असतील. अन्यथा संपूर्ण भारत हिंदू आहे आणि याचे उदाहरण कश्मीरमध्ये आहे. सहाशे वर्षापूर्वी काश्मीरमध्ये कुणीही मुसलमान नव्हता. तेथे सर्व काश्मीरी पंडित होते.
आझाद म्हणाले, 'भारतात कुणीही बाहेरून आलेला नाही. आम्ही सर्व या देशाचे आहोत. आम्ही सर्व या देशाचे आहोत. भारताचे मुसलमान मूळचे हिंदू होते, नंतर धर्मांतरित झाले आहेत. आम्ही बाहेरून आलेलो नाही. आम्ही या मातीत जन्मलो आणि या मातीतच संपणार आहे.'