येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा-शहर व परिसरातील वाढते महिला अत्याचार, लव जिहादच्या घटना संस्कृती व एकोप्याला छेद देणाऱ्या आहेत. नुकतीच येवला शहरात घडलेली घटना अतिशय संतापजनक असून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व लव जिहाद आणि धर्मांतर कायदा त्वरित लागू करावा, असे प्रतिपादन हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) संबोधित करताना हर्षदा ठाकूर यांनी केले.
शहरात नुकत्याच घडलेल्या घटनेबाबत सोमवारी (दि.4) हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे रूपांतर स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात सभेत झाले. या सभेत ठाकूर बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, काही तरुण हे काहीही काम धंदा न करता यांचे राहणीमान हे अत्यंत खर्चिक व संशयास्पद असून हे तरुण शाळा, महाविद्यालय, बस स्थानके, क्लासेस टायमिंग, हॉस्पीटल्स व इतर ठिकाणी विद्यार्थिनी, महिला व मुलींच्या मागे लागून त्यांना त्रास देत जाळ्यात ओढतात. त्यांच्या आयुष्याचे वाटोळे करतात. मुलींसह त्यांचे कुटुंबही याचे बळी ठरतात. त्यांचे सामाजिक व मानसिक स्वास्थ्याचे पतन होते. असहाय्य, दुर्बल घटक बनून समाज जीवनातून बाहेर फेकले जातात. शहर व परिसरात कुंटनखाणे चालू असून त्यावर कडक कारवाईची मागणी ठाकूर यांनी यावेळी केली.
येवला शहर पोलिस स्टेशन हे जुन्या जागेवरच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अस्तित्वात राहावे, यासाठी १५ ऑगस्ट रोजी उपोषण करून महिला सुरक्षेचा प्रश्न त्या विनंती अर्जात नमूद केला होता. तेव्हा आश्वासन देऊन उपोषण सोडविले. तरीही पोलिस स्टेशनचे बांधकाम नवीन जागेत होत आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावर निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यामुळे पोलिस स्टेशन स्थलांतर रद्द करावे, गावच्या मध्यवर्ती ठिकाणी जुने कोर्ट किंवा जुनी नगरपालिका याठिकाणी नवीन पोलिस स्टेशन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अद्वैतराव देशपांडे, श्रावण महाराज जगताप, हर्षा ठाकूर, संग्राम भंडारे, संदीप गिरी महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंद शिंदे, सोनाली परदेशी, राजश्री देशपांडे यांच्यासह शोकडो युवक युवती उपस्थित होत्या. प्रसाद भावसार, रोहित साबरे यांनी सूत्रसंचालन केले.
विंचूर चौफुली येथे जमून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून, अटल बिहारी वाजपेयी कॉर्नर, मेन रोड, जबलेश्वर खुंट, सराफ बाजार, टिळक मैदान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आजाद चौक, शहर पोलिस स्टेशन, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा काळा मारुती रोड मार्गे सेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात पोहोचला. मोर्चाचे रूपांतर स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात सभेत झाले.
हेही वाचा :