hijab row : कर्नाटक सरकारकडून शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचे संकेत

hijab row : कर्नाटक सरकारकडून शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचे संकेत

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील उच्च माध्यमिक आणि पदवी महाविद्यालये १४ फेब्रुवारी पासून पुन्हा सुरु करण्याचे संकेत शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी शुक्रवारी दिले. (hijab row)

माध्यमिक शाळांचे वर्ग तसेच उच्च माध्यमिक आणि पदवी महाविद्यालये १४ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. यावेळी शिक्षणमंत्री बी.सी.नागेश म्हणाले, माध्यमिक शाळांचे वर्ग सोमवार पासून सुरु होतील. तसेच सोमवारी मुख्यंमंत्र्यांच्या बैठकीत उच्च माध्यमिक आणि पदवी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात यईल. (hijab row)

कर्नाटक उच्च न्यायलयाने हिजाब (hijab row)  वरील सर्व याचिकांवरील निर्णय अद्याप प्रलंबित ठेवले आहे. याबातची सुनावणी गुरुवारी पार पडली होती. तेव्हा न्यायालयाने कर्नाटक सरकारला शैक्षणिक संस्था पुन्हा सुरु करण्याबाबत सुचना केल्या होत्या. पण तोपर्यंत शाळा महाविद्यालयांमध्ये भगवे शेले, स्कार्फ, हिजाब आणि धार्मिक झेंडे वर्गात परिधान करणे अथवा घेऊन येण्यावर बंदी असेल असे आदेश न्यायालयाने दिले होते.

हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हिजाब समर्थक व हिजाबला विरोधात प्रदर्शन करणाऱ्यांमुळे कर्नाटकात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या. यापार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने बुधवार पासून माध्यमिक शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाले की, सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू होताना शांतता, कायदा व सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी गृहमंत्री म्हणाले, आमचे पोलिस कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी तयार आहेत, आमचे पोलिस दल आधीच निवडणुका होत असलेल्या विविध राज्यांमध्ये गेले आहेत. आम्ही यापुढे कोठेही पोलिसांना पाठवणार नाही आणि स्थानिक पोलिस तसेच केंद्रीय राखीव दलांच्या सहकार्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ

आम्ही संवेदनशील ठिकाणांची ओळख केली आहे. तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच अधिकचा फौजफाटा देखिल तैनात केला आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्या समाजकंठकांचा शोध सुरु आहे. काही धार्मिक कट्टरपंथी लोकांची ओळख पटली आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांना भडकवून अशी कृत्ये घडवूण आणली. आम्ही लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असे देखिल गृहमंत्र्यांनी माहिती दिली.

logo
Pudhari News
pudhari.news