INDvsWI T20 : केएल राहुल, अक्षर पटेल T20I मालिकेतून बाहेर | पुढारी

INDvsWI T20 : केएल राहुल, अक्षर पटेल T20I मालिकेतून बाहेर

पुढारी ऑनलईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी २० मालिकेतून (INDvsWI T20) वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे.

बीसीसीआयने ट्विटमध्ये म्हटले की, उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांना १६ फेब्रुवारी २०२२ पासून कोलकाता येथे होणार्‍या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून वगळण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुस-या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. तर अक्षर पटेल कोविड-१९ मधून बरा झाल्यानंतर पुनर्वसन प्रक्रियेतून जाईल. दोन्ही खेळाडू आता फिटनेससाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहेत.’
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.

भारताचा T20 संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा

Back to top button