High-Rise Stunt | स्टंट करताना युवकाने गमावला जीव; ६८ व्या मजल्यावरून कोसळून दुर्दैवी अंत

 High-Rise Stunt
High-Rise Stunt
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : धाडसी खेळासाठी प्रसिद्ध असलेला फ्रेंचचा डेअरडेव्हिल रेमी लुसिडीला धाडसी कृत्य करताना जीव गमवावा लागला. 30 वर्षीय फ्रेंच युवक रेमी लुसिडी याचा या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला आहे. हाँगकाँगमधील ६८ मजली ट्रेगुंटर टॉवरवरून ( High-Rise Stunt) खाली पडून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे; असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना काल (दि.३० जुलै) सायंकाळी ६ वाजता घडली. लुसिडी याला अनेकांनी इमारतीवर जाताना पाहिले होते. त्याने गेटवरील सुरक्षा रक्षकाला सांगितले होते की तो 40 व्या मजल्यावर मित्राला भेटायला येत आहे. तथापि कथित मित्राने लुसिडीशी कोणत्याही प्रकराची ओळख नसल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तो लिफ्टमध्ये शिरला ( High-Rise Stunt) होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by NDTV (@ndtv)

यानंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुसिडी ४९ व्या पोहचत, इमारतीच्या वरच्या पायर्‍यावर चढताना दिसला. यानंतर त्याने पेंटहाऊसच्या खिडकीवर टॅप करत, एका अपार्टमेंटमधील महिलेला मदतीसाठी इशारा केला. मात्र मदत मिळण्यापूर्वीच मिस्टर लुसिडीचा तोल जावून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी मिस्टर लुसिडीचा कॅमेरा सापडला, ज्यामध्ये त्याचे धाडसी उंच उंच स्टंट दाखवणारे व्हिडिओ आहेत. सध्या त्यांच्या अकाली निधनाचे अधिकृत कारण अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नाही.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news