ओमायक्रॉननंतर आता ‘एक्सई’ व्हेरियंट देशात दाखल

संग्रहीत
संग्रहीत
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. पंरतु, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने केंद्रासह राज्य सरकारच्या चिंतेत वाढ केली आहे. ओमायक्रॉन नंतर आता 'एक्सई' व्हेरियंट देशात दाखल झाला आहे. जगात सुरूवातीला ब्रिटेनमध्ये या व्हेरियंटने ग्रस्त रुग्ण आढळले होते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पहिला 'एक्सई' व्हेरियंट ग्रस्त आढळल्याने यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तसेच मंगळवारी देशातील उच्च पदस्थ विशेषतज्ञांसोबत बैठक पार पडली अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

बैठकीत एक्सई व्हेरियंटवर कोरोना लसीचा प्रभावा संबंधी चर्चा करण्यात आली आहे. नवीन व्हेरियंटचा अभ्यास तसेच त्यावर देखरेख ठेवण्याची व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल, आरोग्य सचिव राजेश भूषण, दिल्ली एम्स चे संचालक रणदीप गुलेरिया,आयसीएमआरचे महासंचालक डॉ.बलराम भार्गव, एनटीएजीआय प्रमुख डॉ.एन.के.अरोडा तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य व्यवस्थेतील पायाभूत सुविधा, मनुष्यबळाचा आढावा घेण्यासह उपचारकरीता आवश्यक असलेल्या औषधी तसेच त्याच्या उपलब्धतेसंबंधी सातत्याने आढावा घेण्याचे निर्देश मांडविया यांनी दिले आहेत. देशात सुरु असलेल्या कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानाला वेगाने राबवण्यात येईल. तसेच सर्व नागारिकांचे लसीकरण पुर्ण करावे, यावर या बैठकीत भर दिला आहे.

ओमायक्रॉनच्या तुलनेत एक्सई व्हेरियंट १० पटीने अधिक संसर्गजन्य आहे. अशात केंद्र सरकारने सर्व राज्यांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रासह दिल्ली, मिझोरम, हरियाणा तसेच केरळ ला पत्र पाठवून कोरोना तपासण्या, ट्रॅकिंग, उपचार, तसेच कोरोनाबाधितांच्या देखरेखीसंबंधी पत्रव्यवहार केला होता. असे केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news