पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायल- हमास युद्ध मध्य आशियाच्या अन्य भागातही पसरले, अशी धमकी देत अमेरिकेला आम्ही भीक घालत नाही, अशी वल्गना करणार्या हिजबुल्लाचा म्होरक्या सैयद हसन नसराल्लाह याने शुक्रवारी (दि.३) केली होती. याला इस्त्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
इस्त्रायचे प्रवक्ते आयलॉन लेव्ही यांनी नसराल्लाह याने केलेल्या शुक्रवारी केलेल्या व्हर्च्युअल भाषणावर हल्लाबोल केला. त्यानी म्हटले आहे की, नसराल्लाह याचे भाषण कंटाळवाणे होते. मोठा जनसमुदाय असूनही नसराल्लाह स्वतः स्टेजवर नव्हता. तो भ्याड सारखा बंकरमध्ये लपला होता. हिजबुल्लाहवर अलीकडील इस्त्रायल संरक्षण दलाने केलेल्या हल्ल्यात मारला गेला की नाही हे मला माहित नाही,
नसराल्लाह याने याने आपल्या भाषणत इस्रायलला मिळत असलेल्या अमेरिकेच्या पाठिंब्यावरही टीका केली होती. नसराल्लाह याने गेल्या आठवड्यात बेरूतमध्ये हमासचा म्होरक्या सालेह अल-अरौरी आणि पॅलेस्टिनी-समर्थित गट इस्लामिक जिहादच्या झियाद नखलेह या दोघांची भेट घेतली होती.
हेही वाचा :