पुढारी ऑनलाईन डेस्क: 'बिहू' हा आसाममध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे, जो कृषी हंगामाची सुरुवात करणारा सण म्हणून ओळखला जातो. दरम्यान अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आसामधील जनतेला त्यांच्या ट्विटरवरून 'बिहू' या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री आणि भाजप नेत्या, मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी देखील आसाम वासीयांना या सणाच्या शुभेच्छा देताना 'बिहू' हा बिहारचा सण (Hema Malini Mistake) असल्याचे म्हणत, शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर त्यांच्या चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना टीका करत ट्रोल देखील केले आहे. यावर त्यांनी 'i am Sorry' असे म्हणत पुन्हा ट्विट केले आहे.
हेमा मालिनी यांनी बिहूच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की, 'सध्या सुगीचा हंगाम सुरू आहे. तमिझ पुथंडू (नवीन वर्ष), बैसाखी (पंजाब), बिहू (बिहार) (Hema Malini Mistake) आणि पोहेला बैशाख किंवा नबा वर्षा (बंगाल) असे विविध राज्यात विविध उत्सव साजरे केले जातात. तुम्हा सर्वांना या सण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा' असे त्यांनी म्हटले आहे. या ट्विटवर नेटकऱ्यांनी भाजप नेत्या हेमा मालिनी यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्या या चुकीवर नेटकऱ्यांनी 'हाँ सही तो है…'B' से बिहार और 'B' से बिहू', म्हणूनच 'शिक्षण' हा जीवनाचा 'अविभाज्य' भाग आहे!, "बी" मतलब बिहार नाही है हेमा जी, दादी माँ का, बिहू हा आसामचा सण आहे, बिहारचा नाही. असा प्रतिसाद देत, ट्रोल केले आहे.
हेमा मालिनी यांच्या ही गोष्ट लक्षात येताच, त्यांनी पुन्हा त्यांच्या चुकीवर (Hema Malini Mistake) माफी मागत ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'चुकून मी 'बिहू' हा बिहारमध्ये साजरा केला जाणारा सण असे म्हटले आहे. मला माफ करा! ते बिहू, हा आसामचा सण वाचावा' असे अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी स्पष्ट केले आहे.