Helicopter crashed: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर पाण्यात कोसळले; पायलट जखमी

Helicopter crashed
Helicopter crashed
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधील किश्तवारजवळ लष्कराचे एएलएच ध्रुव हे हेलिकॉप्टर आज (दि.०४) सकाळी अचानक कोसळले. लष्काराचे हे विमान अचानक पाण्यात कोसळून (Helicopter crashed) झालेल्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलट जखमी झाले असून, ते सध्या तरी सुरक्षित आहेत. अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

लष्कराच्या कोसळलेल्या धुव्र या हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter crashed) भारतीय सैन्य दलातील तीन अधिकारी होते. त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव कार्य सुरू आहे. अद्याप त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात लष्कराचे हे हेलिकॉप्टर कोसळले(Helicopter crashed), तो जम्मू काश्मिरमधील किश्तवारचा अतदुर्गम भाग आहे. ही दुर्घटना झाली तेव्हा तसेच गेल्या दोन तीन दिवसांपासून या भागात थांबून थांबून पाऊस पडत असल्याचे देखील लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीत सांगितले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news