परभणी : चक्रीवादळाने हाहाकार; जनावरांचे गोठे; विजेचे खांब, आमराई जमिनदोस्‍त

चक्रीवादळाने हाहाकार
चक्रीवादळाने हाहाकार

पूर्णा : पुढारी वृत्‍तसेवा तालुक्यातील चुडावा गाव शिवारात (गुरुवारी) चक्रीवादळाने हाहाकार उडवला. शेतातील जनावरांचे गोठे, मांडव अखाडे, रेशीम कोष निर्मीतीचे शेड, विजेच्या तारांसह खांब, आमराई फळझाडे उपटून पडल्‍याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

चक्रीवादळाची तीव्रता एवढी भयानक होती की, शेतात अखाड्यावर उभ्या केलेल्या ट्रैक्टर ट्राली देखील उलटल्या. पावसापासून बचाव करण्यासाठी ट्रॉलीखाली बसलेल्या युवराज केरबाजी अडकीणे यांच्या अंगावर ट्राली उलटली यात तो जबर जखमी झाला. तसेच चक्रीवादळाने उभे असलेले विजेचे खांब उपटून पडले यामुळे तारा तुटल्या. यामुळे चुडावा परिसरात तीन दिवसांपासून विद्यूतपूरवठा बंदच आहे. तसेच चुडावा येथील चंद्रकांत हरिभाऊ देसाई यांचा रेषीम तुती कोष निर्मीतीचा शेड उध्वस्त झाला. त्याच बरोबर नानासाहेब देवराव देसाई यांच्या शेतातील रेशीम उत्पादनाचा कोष क्राप प्रक्रीया चालू असताना चक्रीवादळामुळे संपूर्ण जमिनीवर कोसळून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

यासह अनेक शेतक-यांचे रेशीम कोष उत्पादनाचे शेड जमिनदोस्त झाले. अंबादास मुंजाजी देसाई यांची आमराईतली झाडे उन्मळून पडुन फळांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, येथील तलाठी खिल्लारे, मंडळ अधिकारी लटपटे, नायब तहसिलदार प्रशांत थारकर, तहसिलदार माधवराव बोथीकर, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर हे लोकसभा निवडणूक कामात व्यस्त झाले आहेत. त्यांनी वेळ काढून पूर्णा तालूक्यात वादळीवारा, अवकाळी पावसात शेती, घरे, विद्युत खांब, फळबागांच्या नुकसानीचे त्‍वरीत पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news