राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; केरळ, कर्नाटकसाठी आज-उद्या रेड अलर्ट

राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; केरळ, कर्नाटकसाठी आज-उद्या रेड अलर्ट

पुणे : केरळ, कर्नाटकला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आल्याने राज्यातही कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात 5 ते 7, तर मध्य महाराष्ट्रात 6 व 7 रोजी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर पाच दिवसांपासून ढगांची प्रचंड गर्दी होत आहे. तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तिकडून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर येत आहेत, त्यामुळे कोकणात पावसाचा जोर जास्त आहे. 5 ते 7 जुलैदरम्यान कोकणात, तर 6 व 7 रोजी मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याला हा अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सूनने रविवारी संपूर्ण देश व्यापल्याने पश्चिमी वार्‍यांना आता बळकटी मिळाली आहे. त्यामुळे देशभर जोरदार पाऊस सुरू असून, गुजरातमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. हिमालयासह पश्चिम बंगाल भागात अतिवृष्टी सुरू आहे. गुजरातमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने तेथे अतिवृष्टी सुरूच आहे.

चोवीस तासांत झालेला राज्यातील पाऊस (मि.मी.मध्ये)

दोडामार्ग 130, भिवंडी 116, दापोली 90, अंबरनाथ 86, कणकवली 82, सावंतवाडी, काणकोण 75, लांजा, माथेरान 63, कुडाळ 58, कल्याण 58, रत्नागिरी 54, ठाणे, चिपळूण, पालघर 50, गगनबावडा 85, लोणावळा, इगतपुरी 55, राधानगरी 48, देवणी, उमरगा 55, धाराशिव 54, छत्रपती संभाजीनगर 48, पुसद 10, देऊळगाव राजा 6, अंबोणे 115, शिरगाव, दावडी 65, लोणावळा, भिवपुरी, ताम्हिणी खोपोली, कोयना 56, डुंगुरवाडी 52, खंद 51, वळवण 47, शिरोटा 40.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news