पुणे : राज्यात बहुतांश भागातील पाऊस कमी झाला असून फक्त कोकणात पावसाचा जोर आहे. उर्वरित भागातून मात्र पाऊस कमी झाला आहे. उत्तर भारतात पावसाचा जोर अजूनही सुरु असून महाराष्ट्रातून पावसाचा जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सोमवारी कडक उन्ह पडले होते. फक्त कोकण, विदर्भातील काही भाग आणि मध्यमहाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार ते मध्यम पाऊस सुरु आहे. आगामी 23 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा फारसा जोर राहणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
कर्जत 43, पोलादपूर 31, लोणावळा 54, महाबळेश्वर 31, धुळे 26, हिंगोली 0.7, घनसावंगी 0.7, भंडारा 52, मेहकर 22, तुमसर 20, मालेगाव 18, मोताळा 17,घाटमाथा: ताम्हीणी 75, दावडी 56, डुंगरवाडी 54.
हेही वाचा