Heatwave | राज्यातील ‘या’ भागात पुढील ३ दिवस उष्णतेची लाट, IMD चा इशारा

Heatwave | राज्यातील ‘या’ भागात पुढील ३ दिवस उष्णतेची लाट, IMD चा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी (दि.३१) मध्य आणि द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये मंगळवार 2 ते 4 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, विदर्भासह, मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक आणि तामिळनाडूत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. (Heatwave)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, वायव्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात १ एप्रिल ते ३ एप्रिल दरम्यान आणि मराठवाड्यात १, २ एप्रिल रोजी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. काल मराठवाड्यातील काही ठिकाणी अचानक ९५ टक्क्यांनी तापमानात वाढ झाल्याचेदेखील हवामान विभागाने म्हटले आहे. (Heatwave)

देशातील रायलसीमा, कर्नाटक, मराठवाडा आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये ४ एप्रिलपर्यंत तर कमाल तापमान ९५ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर ४ एप्रिलपासून छत्तीसगड, झारखंड, पूर्व मध्यप्रदेश आणि विदर्भात आणि ३ एप्रिलपासून तमिळनाडूतील तापमानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Heatwave)

बुलेटिननुसार, गुरूवार ४ एप्रिलपर्यंत ओडिशात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर याचदरम्यान ईशान्य भारतात पाऊस आणि गडगडाटी वादळाचा अंदाज वर्तवला आहे. ईशान्य आसाममध्ये चक्रीवादळाची शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news