राहुल गांधी ( संग्रहित छायाचित्र )
राहुल गांधी ( संग्रहित छायाचित्र )

HBD Rahul Gandhi : उर्मिला मातोंडकरांनी राहुल गांधींना दिल्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा, “तू न रुकेगा…”

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा आज (दि. १९) वाढदिवस आहे. भारत जाेडाे यात्रेमुळे मागील काही महिन्यांपासून ते पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत. आज त्‍यांना वाढदिवसानिमित्त अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सुप्रसिद्ध कवी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कविता ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (HBD Rahul Gandhi)

HBD Rahul Gandhi : तू कायम प्रेमाचं दुकान चालवत राहा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी झाला. ते ५३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कवी आणि बीग बी अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांची सुप्रसिद्ध "तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी…"  कविता ट्विट शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत त्यांनी राहुल गांधी यांचा फोटोही ट्विट केला आहे.

"तू न थकेगा कभी,

तू न रुकेगा कभी,

तू न मुड़ेगा कभी,

कर शपथ, कर शपथ, कर शपथ,

अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

यह महान दृश्य है,

चल रहा मनुष्य है,

अश्रु श्वेत रक्त से,

लथपथ लथपथ लथपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।"

निडर नेता श्री. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव करो," तू कायम प्रेमाचं दुकान चालवत राहा." अशा शुभेच्छा देत त्यांनी राहुल गांधी यांना टॅग केलं आहे.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news