राहुल गांधी यांनी अमेरिकेतही केली ट्रकमधून सफर | पुढारी

राहुल गांधी यांनी अमेरिकेतही केली ट्रकमधून सफर

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : नुकत्याच आपल्या अमेरिका दौर्‍यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन डीसी ते न्यूयॉर्क प्रवास चक्क एका मालवाहू ट्रकमधून केला. या प्रवासात त्यांनी चालकासोबत गप्पा मारताना भारतातील ट्रकचालकांची स्थिती व अमेरिकेतील स्थिती यावर चर्चा केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी एका भारतीय चालकाच्या ट्रकमधून 225 मैलांचा प्रवास केला. याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. तलजिंदर सिंग असे या ट्रकचालकाचे नाव असून प्रवासात राहुल यांनी त्याला वाहनातील म्युझिक सिस्टीमवर सिद्धू मुसेवालाचे 295 हे प्रसिद्ध गाणे लावायला लावले व त्याचाही प्रवासात आनंद घेतला. अमेरिकेत मालवाहू ट्रक आणि त्या ट्रकचालकांची अवस्था, त्यांना मिळणारे उत्पन्न व सुविधा याबाबत राहुल यांनी तलजिंदरसिंगशी चर्चा केली.

Back to top button