Haryana Accident : ड्रायव्‍हरच ठरला वैरी..! हरियाणातील स्‍कूल बस अपघातामागील कारण आले समोर

Haryana Accident
Haryana Accident
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: देरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यात भीषण अपघात घडला. यामध्ये ६ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. आज (दि.११) ईदनिमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी असताना देखील शाळा प्रशासनाकडून नियम डावलून वर्ग सुरू ठेवण्यात आले होते. परंतु शाळेत पोहचण्यापूर्वीच या ६ विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. या अपघातामागील धक्‍कादायक कारण समोर आले आहे. (Haryana Accident)

बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत; जखमी विद्यार्थ्याची माहिती

भीषण अपघातातील एका जखमी विद्यार्थ्याने 'एएनआय'ला सांगितले की, विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या या खासगी बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. बसचा वेगही १२० इतका होता. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, असे विद्यार्थ्याने म्हटले आहे. या संदर्भातील व्हिडिओ 'एएनआय'ने शेअर केला आहे. (Haryana Accident)

Haryana Accident: बसचे फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य

मिळालेल्या माहितीनुसार, या स्कूल बसची कागदपत्रेही पूर्ण नाहीत. बसचे फिटनेस प्रमाणपत्र देखील कालबाह्य झाल्याचे दिसत आहे. त्यानंतरही शाळा प्रशासन ही बस चालवत होते. त्यामुळे देखील हा भीषण अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Haryana Accident)

घटनास्थळी पोहोचत असताना एका विद्यार्थ्याच्या पालकांचाही अपघात

स्कूल बस अपघाताची माहिती मिळताच, एक पालक आपल्या मुलीला पाहण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असता तेही अपघाताचे बळी ठरले आहे. या अपघातात मुलीच्या आईचा पाय मोडला आहे. तर त्यांच्या मुलीचा स्कूल बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news