Haryana Road Accident: हरियाणात खासगी स्कूल बसचा भीषण अपघात, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १५ हून अधिक जण जखमी | पुढारी

Haryana Road Accident: हरियाणात खासगी स्कूल बसचा भीषण अपघात, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १५ हून अधिक जण जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क: हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना शहरात भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी (दि.११) सकाळी एका खासगी शाळेच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली आणि हा अपघात झाला. यामध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर १५ हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Haryana Road Accident)

हरियाणातील कनिना-दादरी रोडवर कनिबा शहराजवळ हा अपघात झाला आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गंभीर जखमी विद्यार्थ्यांना रेवाडी येथे रेफर करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. (Haryana Road Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे. दुसरीकडे बसचालक दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान बस चालकाचे स्कूल बसवरील नियंत्रण सुटले आणि उन्नी गावाजवळ विद्यार्थ्यांना भरलेली स्कूल बस अचानक उलटली आणि हा अपघात झाला. (Haryana Road Accident)

आपघात घडलेली ही बस जीएल पब्लिक स्कूल या खासगी शाळेची होती, त्यात सुमारे 35 ते 40 मुले प्रवास करत होती. आज सरकारी सुट्टीच्या दिवशीही शाळा भरवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुलांना घेण्यासाठी शाळेतून बस पाठवण्यात आली. विद्यार्थ्याना शाळेत घेऊन परत जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.

Back to top button