HBD Yash : ‘केजीएफ’ फेम यश कोट्यवधींच्‍या संपत्तीचा मालक; पण वडील आजही बस ड्रायव्हर

south superstar yash
south superstar yash

पुढारी ऑनलाईन

ब्लॉकबस्टर चित्रपट केजीएफ अभिनेता यश (Yash) आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ८ जानेवारी, १९८६ रोजी झाला. साऊथमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारा यश आता आगामी चित्रपट KGF २ मध्ये दिसणार आहे. फॅन्सना त्याची उत्सुकता लागून राहिली आहे. यशच्या केजीएफ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घातला होता.

यश कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. पण, वडील आजदेखील बस ड्रायव्हर आहेत. यशने म्हैसूरमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यशने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. यश सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्याने आपल्या मेहनतीने चित्रपट इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं. कोटींच्या संपत्तीचा मालक असणाऱ्या यशचे वडील आजदेखील बस ड्रायव्हर म्हणून काम करतात.

कर्नाटकात जन्मलेल्या यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे. टीव्ही मालिका नंदा गोकुळमधून त्याने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्याने २००७ मध्ये चित्रपट Jambada Hudugi तून डेब्यू केला होता. या चित्रपटात त्याची सेकंड लीड भूमिका होती.

यशने आपल्या १४ वर्षांच्या चित्रपट करिअरमध्ये १९ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो ४० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. बंगळूरुमध्ये ३ कोटी रुपयांचा बंगला आहे. याशिवाय त्याच्यकडे ऑडी क्यू ७ (१ कोटी रुपये) आणि रेंज रोव्हर (८० लाख रुपये) आहे. यश एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेतो. तो जवळपास ३० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

यशच वडील अरुण कुमार बस ड्रायव्हर आह. आजदेखील तो या प्रोफेशनमध्ये आहे. बस ड्रायव्हरची नोकरी करत अरुण यांनी यशला मोठं केलं. अरुण त्यांचा व्यवसाय सोडू शकत नाहीत. कारण, याचमुळे त्यांचा मुलगा इतका मोठा अभिनेता झाला आहे.

बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजमौली यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मला हे जाणून आश्चर्य वाटलं होतं की, यशचे वडील एक ड्रायव्हर आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी किती काही केलं. ते माझ्यासाठी रिअल हिरो आहेत.

इतकी सुंदर आहे पत्नी

यशने राधिका पंडितशी लव्ह मॅरिज केलं आहे. दोघांची पहिली भेट टीव्ही मालिका नंदा गोकुळमध्ये झाली होती. त्यावेळी दोघांच्यात मैत्री झाली. पुढे त्यांनी गोव्यात गुपचुप साखरपुडा आणि बंगळुरुमध्ये लग्न केलं होतं. खास बाब म्हणजे यशने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कर्नाटकाच्या संपूर्ण जनतेला आमंत्रण दिलं होतं. राधिका आणि यश यांना दोन मुले आहेत.

यशने अनेक टीव्ही शोजमध्ये काम केलं आहे. त्यानंतर यशला दिग्दर्शक शशांकचा चित्रपट Moggina Manasu ऑफर झाला. २००८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिता पंडितसोबत सपोर्टिंग भूमिका मिळाली होती. हिट चित्रपट Modalasala, राजधानी, किरतका, लकी, जानू यासारखे चित्रपट यशने केले.

केजीएफने चमकवलं नशीब

टीव्हीमध्ये आणि चित्रपटामध्ये करिअरच्या सुरुवातीला यशचं करिअर ठिकठाक सुरू होतं. परंतु, तिच्या करिअरमध्ये चारचांद लागले ते 'केजीएफ चॅप्टर-१'ने. हा त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे आजदेखील प्रेक्षकांच्या तोंडात यशचं नाव आहे. यामध्ये त्याने राजा कृष्णप्पा बैरया उर्फ रॉकीची भूमिका साकारली होती. या चित्रटानंतर त्याला प्रेमाने रॉकी भाईदेखील बोलावलं जातं.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news