HBD Prabhu Deva : म्हैसूरचा मुलगा कसा झाला भारताचा मायकल जॅक्सन?

prabhu deva
prabhu deva

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज मल्टीटॅलेंटेड प्रभुदेवा (HBD Prabhu Deva) आपला वाढदिवस साजरा करत आहे. प्रभु देवाला भारताचा 'मायकल जॅक्सन' म्‍हटले जाते. दोन वेळा बेस्ट कोरिओग्राफरचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळवणारा प्रभुदेवाचे बॉलिवूडसह तमिळ, तेलगू, मल्‍याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्‍ये मोठे योगदान आहे. प्रभु देवा कोरिओग्राफरच नाही तर अभिनेता आणि दिग्‍दर्शकही आहे. (HBD Prabhu Deva)

प्रभु देवाचा जन्‍म कर्नाटकामध्‍ये म्‍हैसूर येथे झाला. प्रभुदेवाने अभिनयाची सुरुवात मणिरत्‍नम यांचा १९८८ मध्‍ये आलेला चित्रपट 'अग्‍निनतचतिरम'मधून एक डान्‍सर म्‍हणून केली. तर २००९ मध्‍ये दिग्‍दर्शक म्‍हणून 'वॉन्टेड' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर 'राउडी राठोड', 'ॲक्शन जॅक्सन', 'दबंग-३' यांसारखे चित्रपट त्‍याने आणले. विशेष म्‍हणजे, प्रभुदेवाला आपल्‍या वडिलांकडून डान्‍स शिकण्‍याची प्रेरणा मिळाली. प्रभु देवाचे पूर्ण नाव प्रभुदेवा सुंदरम असे आहे. प्रभू देवाचे वडील 'मुरुग सुंदर' हे दाक्षिणात्‍य प्रसिध्‍द कोरिओग्राफर होते.

एका मुलाखतीत प्रभू देवाने म्हटले होते-'मी एक क्लासिकल डान्सर आहे. मी भरतनाट्यम शिकलो आहे. त्याचवेळी मायकल जॅक्सनचा अल्बम थ्रिलर आला होता. जेव्हा मी हा अल्बम पाहिला तेव्हा आश्चर्यचकित झालो. आणि विचार करू लागलो की, हा व्यक्ती कोण आहे. माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव मायकल जॅक्सनचा राहिला आहे.मी शिक्षणात इतका खास नव्हतो. माझे वडील चित्रपट इंडस्ट्रीत कोरिओग्राफर होते, मी केवळ डान्स करू लागलो आणि कोरिओग्राफर झाला. डान्ससारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही.'

वडिलांनी केले होते कौतुक

प्रभु देवाचे वडील मुगूर सुंदर यांनी केवळ एकदा त्‍याच्‍या डान्‍सचे कौतुक केले होते. प्रभु देवा यांचा तेलुगु दिग्‍दर्शित पहिला चित्रपट नुव्‍वोस्‍तन्‍ते नेनोडदंता होता. यामध्‍ये प्रभु देवा यांचे काम पाहिल्‍यानंतर त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याचे कौतुक केले होते.

अशी मिळाली ओळख

प्रभु देवाने १०० हून अधिक चित्रपटांमध्‍ये कोरिओग्राफर म्‍हणून काम केले आहे. आतापर्यंत १३ चित्रपटांचे दिग्‍दर्शन केले आहे. तर ४ चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्‍याने आतापर्यंत विविध ५ भाषांमधील चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. याचबरोबर, भारताची पहिला ३ डी चित्रपट एबीसीडीमध्‍ये त्‍याने मुख्‍य भूमिका साकारली होती. त्‍याचबराबेर, २०१२ मध्‍ये आयपीएल ओपनिंग सेरेमनीमध्‍ये त्‍यांने अमिताभ बच्‍चन, सलमान खान, प्रियांका चोप्रासोबत स्‍टेज डान्‍स शेअर केला होता.

प्रभुदेवा यांना १९९३ मध्‍ये आलेला चित्रपट जेंटलमॅनमधून ओळख मिळाली. चित्रपट 'जेंटलमॅन'मधील एक गाणे चिकू बुकू रइले यामुळे प्रभुदेवा यांना ओळख मिळाली.

कोरिओग्राफ केले बॉलिवूडचे हे चित्रपट

कोरिओग्राफर प्रभु देवा यांनी ९० च्‍या दशकात आपल्‍या करिअरची सुरुवात केली होती. प्रभु देवा यांनी दिग्‍गज कलाकारांसोबत काम केले आहे.

'या' कारणामुळे झाला घटस्‍फोट

त्‍याचबरोबर, प्रभुदेवाच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍याविषयी बोलायचे झाले तर तो दक्षिणात्‍य चित्रपटाची प्रसिध्‍द अभिनेत्री नयनतारासोबत लिव्‍ह इन रिलेशनशीपमध्‍ये राहत होता. या कारणामुळे प्रभुदेवाचे लग्‍न मोडले. प्रभुदेवाचे लग्‍न लता यांच्‍याशी झाले होते. त्‍यांच्‍या पत्नीला नयनताराविषयी समजले. त्‍यावेळी त्‍या नाराज झाल्‍या. २०१० मध्‍ये त्‍यांनी फॅमिली कोर्टामध्‍ये याचिका दाखल केली. २०११ मध्‍ये प्रभुदेवाचा घटस्‍फोट घेतला. प्रभु देवा आणि लता यांना ३ मुले आहेत. त्‍यापैकी त्‍यांच्‍या मोठ्‍या मुलाचे कॅन्‍सरमुळे २००८ मध्‍ये निधन झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news