पुढारी ऑनलाईन डेस्क : वेंकटेश प्रभू कस्तूरी राजा अर्थात धनुष ४० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. (HBD Dhanush) तमिळ आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे व त्याने कलाकार म्हणूनच नाही तर निर्माता, गीतकार आणि पार्श्वगायक म्हणूनसुद्धा काम केलेले आहे. जवळजवळ २० वर्षांपूर्वी २००२ मध्ये धनुषने पडद्यावर पदार्पण केले होते आणि तरुणांचे नाट्य असलेल्या थुल्लुवाधो इलामाईमध्ये भूमिका केली होती. याचे लेखन आणि दिग्दर्शन त्याचे बंधू के. सेल्वराघवन. यांनी केले होते. त्यानंतर या अभिनेत्याने बॉक्स ऑफीसवर यशस्वी झालेल्या अनेक आघाडीच्या भूमिका पार पाडल्या. ज्यामध्ये पुधु पेताई, थिरूविलेयादल आरंबम, काधाल कोंडेन, असुरन, आणि आदुकलम यांचा समावेश आहे. (HBD Dhanush)
आदुकलम आणि असुरनमधील त्याच्या भुमिकेमुळे त्याला अनुक्रमे ५८ व्या, ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. अभिनेत्याने आनंद एल. राय दिग्दर्शित रांझना चित्रपटाद्वारे हिंदी सृष्टीमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा ह्या वर्षी सुरूवातीला केली गेली आहे.
IMDb नुसार धनुषच्या सर्वाधिक रेटिंग असलेल्या टॉप ११ चित्रपट असे आहेत –
पुधु पेताई – ८.५
असुरन – ८.४
वादा चेन्नै – ८.४
आदुकलम – ८.१
कर्नन – ८
कधाल कोंडेन – ८
थिरूचित्रबालम – ७.९
वेलैयिल्ला पात्थारी – ७.८
पोल्लाधावेन – ७.७
मयक्कम एन्ना – ७.७
रांझना – ७.६