darsheel safary : ‘तारे जमीं पर’ मधील ईशान अवस्थी इतका बदलला

actor darsheel safary
actor darsheel safary
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट 'तारे जमीं पर' मधील इशान अवस्थी (darsheel safary) आठवतो का? मुलांशी संबंधित खूपच संवेदनशील मुद्द्यावरील तारे जमीं पर हा चित्रपट होता. या चित्रपटात बालकलाकार म्हणून चाईल्ड आर्टिस्ट दर्शील सफारी (Darsheel Safary) ने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचेच मन जिंकून घेतले होते. या चित्रपटावेळी दर्शीलचं वय केवळ १० वर्ष होतं. आज ९ मार्च, २०२२ रोजी दर्शील २५ वर्षांचा झाला आहे. १५ वर्षात दर्शीलचा लूक बदलला आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

दर्शील सफारी
दर्शील सफारी

या चित्रपटाव्यतिरिक्त तो बम बम बोले, मिडनाइट्स चिल्ड्रन यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. २०२० मध्ये त्याने टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेनसोबत एक म्युझिक व्हिडिओही केला होता. याशिवाय दर्शील 'ये है आशिकी', 'चल यार ट्राय मार' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. तरीही त्याला तारे जमीं पर या चित्रपटातील इशान या नावाने ओळखले जाते.

आमिर खान स्टारर चित्रपट 'तारे जमीं पर' मध्ये दर्शीलने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे बालकलाकार दर्शील रातोंरात स्टार झाला होता. आता काळानुरुप त्याचा लूक बदलललाय. निरागस दिसणारा दर्शील आता हँडसम हंक झाला आहे. सोशल मीडियावरही तो ॲक्टिव्ह असतो. त्याचे काही मव्या लूकमधील फोटोही सोशल मीडिय़ावर पाहायला मिळतात. त्याचा हा नवा लूक पाहून चाहते मात्र थक्क झाले आहेत.

दर्शील सफारी
दर्शील सफारी

२००८ मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले होते. त्यावेळी दर्शील फक्त बालकलाकार होता. या चित्रपटात त्याने ईशान अवस्थीची भूमिका साकारली होती. तो फारच कमी बोलणारा आणि एक निरागस मुलगा दाखवण्यात आला होता. जो स्वतःच्या विश्वात मग्न असायचा. तो इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा दाखवण्यात होता. या चित्रपटात तो आमिर खानच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत होता. आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.

दर्शील सफारी
दर्शील सफारी

 

View this post on Instagram

 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

 

View this post on Instagram

 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

 

View this post on Instagram

 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

 

View this post on Instagram

 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news