HBD Aishwarya Rai : दुबईत १६ कोटींचा विला, कोटींचे दागिने थाटात राहते ऐश्वर्या राय

Aishwarya Rai
Aishwarya Rai
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेक जाहिराती आणि मॉडेलिंगसाठी तिने काम केले. जेव्हा तिला चित्रपट मिळत गेले, तेव्हा तिने मागे वळून पाहिले नाही. १० हून अधिक फिल्मफेअर ॲवॉर्ड्ससाठी ती नॉमिनेट झालीय. ऐश्‍वर्याला 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास'सहित अनेक चित्रपटांसाठी उत्कृष्ट अभिनेत्रींचा पुरस्कार मिळाला. तिचा शेवटचा चित्रपट पोन्नियिन सेलवन -२ मध्ये दिसली होती. (HBD Aishwarya Rai ) ज्यासाठी तिने कोटीं रूपये मानधन घेतले होते. (HBD Aishwarya Rai )

संबंधित बातम्या –

ऐश्वर्याची संपत्ती ७७६ कोटी रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास १० ते १२ कोटी रुपये फी घेते. याशिवाय ऐश्वर्या ब्रांड एंडोर्समेंटच्या माध्यमातून वार्षिक कोट्यवधींची कमाई करते. ऐश्वर्याची वार्षिक कमाई जवळपास १५ कोटी रुपये आहे.

दुबईच शानदार विला

रिपोर्टनुसर, दुबईत सेंचुरी फॉलमध्ये १६ कोटींचा आलीशान विला आहे. ही प्रॉपर्टी शहराच्या मध्ये आहे.

मुंबईत २१ कोटींचे अपार्टमेंट

ऐश्वर्या रायकडे मुंबईतील बांद्रा परिसारात एक भव्य अपार्टमेंट आहे. याची किंमत ३० कोटी रुपये आहे. या आलीशान अपार्टमेंटमध्ये ५ मोठे बेडरूम आहेत. फ्लॅट फ्रेंच विडोंजने सजवले आहे. हा फ्लॅट Skylark Towers च्या ३७ व्या मजल्यावर आहे.

कोटींचे लक्झरी कार्स

ऐश्वर्या रायकडे फेव्हरेट कार 'Bentley CGT' आहे. जगातील शानदार कारपैकी ही एक आहे. या लक्झरी कारची किंमत ३.६५ कोटी रुपये आहे. तिच्याकडे २.३५ कोटींची Mercedes Benz S500 कारदेखील आहे. शिवाय १.१२ कोटी रुपयांची Audi 8L कार आहे.

कोटींची ज्वेलरी

ज्वेलरी आणि महाग साड्यांनी ऐश्वर्याचे वॉर्डरोब भरून गेले आहे. जेव्हा ऐश्वर्याचे लग्न अभिषेकशी झालं होतं, तेव्हा तिने ७५ लाख रुपयांची सोने जडित साडी नेसली होती. तर लग्नाची जवळपास किंमत ५० लाख रुपये होती. ही अंगठी ५३-कॅरेट सॉलिटेयर डायमंडपासून बनवलेली होती. याशिवाय तिच्याकडे अनेक किमती ज्वेलरी कलेक्शन आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news