BB -17 : ऐश्वर्या शर्मा आणि विक्की जैनमध्ये जोरदार भांडण, अंकिता सुशांतविषयी काय म्हणाली?

 Aishwarya Sharma
Aishwarya Sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस 17 मध्ये सुरुवातीपासूनच अंकिता लोखंडेचा पती विक्की जैन मास्टरमाईंड बनला आहे. जिथे त्याच्या आणि अंकिताच्या नात्यात स्पष्टपणे दुरावा येत असलेला दिसतो आहे. (BB -17) विक्की घरातील जवळपास प्रत्येक मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देण्यापासून ते घरातील सदस्यांच्या मेंदूशी खेळण्यापर्यंत सर्व काही उत्तमपणे करताना दिसत आहे. कालच्या एपिसोडमध्ये विक्की जैन आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यात भांडण झाले. एकीकडे वीकेंड के वार नंतर ही घरात समर्थ-ईशा-अभिषेकच्या नात्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे अंकिता आणि ऐश्वर्या यांच्यात खूप मोठं भांडण झालेलं दिसलं. दरम्यान, अंकिता सुशांत सिंह राजपूतविषयी बोलताना दिसली. (BB -17)

संबंधित बातम्या –

ऐश्वर्या – विक्की यांच्यातील भांडणाची सुरुवात विक्कीच्या कॉमेंटने झाली. विक्कीने ऐश्वर्याचा पती नीलवर कॉमेंट केलं होतं. हे ऐश्वर्याला अजिबात आवडला नाही. नील – विक्की डेटिंग आणि लग्नाविषयी बोलत होते. दरम्यान, नील म्हणतो की, ऐश्वर्याने डेटिंग नाही केलं. सरळ लग्न केलं. त्यानंतर विक्कीने ऐश्वर्याची खिल्ली उडवली. आधी या चेष्टा-मस्करीमध्ये नीलदेखील सहभागी होता. ऐश्वर्या रागाने तेथून निघून जाते. पण विक्की ऐकत नाही. ऐश्वर्या विक्कीला म्हणते की, जिनके खुद के घर कांच के होते हैं, उन्हें दूसरों पर पत्थर नहीं उछालने चाहिए. खरं तर ती अंकिता आणि विक्कीच्या नात्यावरून टोमणे देते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news