हनुमान जन्मस्थळ वाद : …म्हणून अंजनेरीच्या ग्रामस्थांनी मानले साधू-महंतांचे आभार

त्र्यंबकेश्वर : अंजनेरी येथे साधू-महंतांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित मान्यवर व साधू-महंत.
त्र्यंबकेश्वर : अंजनेरी येथे साधू-महंतांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित मान्यवर व साधू-महंत.
Published on
Updated on

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे नाशिकसह त्र्यंबकेश्वरच्या साधू – महंतांनी धर्मसंसदेत प्रतिवाद करीत सप्रमाण दाखवून दिल्याने स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी त्रागा करत शास्त्रार्थ सभा पूर्ण होऊ दिली नाही. मात्र, दुसर्‍या दिवशी रामजन्मभूमी न्यासाचे पुजारी पाठकशास्त्री यांनी निर्वाळा दिल्याने माजी उपसरपंच गणेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी महंत ब्रम्हगिरी महाराज, अशोकबाबा व महंत पिनेकाश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाने साधू – संतांचा तसेच परिसरातील नेत्यांचा बालहनुमान अंजनीमाता मंदिरात सन्मान करण्यात आला.

यावेळी पिनकेश्वर महाराज यांनी लवकरच अंजनेरी गडावर 121 फूट उंच धर्मध्वजा उभारण्याचे जाहीर केले आहे. ऋणनिर्देश सभेस महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज, महंत सुधीरदास पुजारी महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत उदयगिरी महाराज, महंत शंकरानंद महाराज, ठाणापती रतनगिरी, दुर्गानंद ब—ह्मचारी, अभयानंद ब—ह्मचारी, कंठानंद महाराज, श्रीनाथानंद व सिद्धेश्वरानंद महाराज यांच्यासह तसेच संपराव सकाळे, सुरेश गंगापुत्र आदी उपस्थित होते.

धर्मसभेला कोणाची परवानगी?
या सभेस अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी धर्मसंसदेसाठी चार पीठांच्या शंकाराचार्यांची परवानगी आवश्यक असते. मात्र, येथे कोणाची परवानगी घेतली, असे विचारत धर्म संसदच चुकीची असल्याचे म्हटले. तर महंत सुधीरदास पुजारी यांनी अंजनेरीच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news