गुलाबराव पाटील : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे

गुलाबराव पाटील : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शासनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रम हा शासनाचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सार्वजनिक कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा पोलीस कवायत मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी सुरू असून रविवार, दि.25 आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देवून पाहणी दरम्यान ते बोलत होते. यावेळी विविध सुचना पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जून रोजी, जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला अनुदान आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवला जात आहे. त्यामुळे यासाठी कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही. जे शासकीय योजनांची लाभार्थी आहेत. त्यांना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news