Gujrat Election Result 2022 : उत्तर जामनगरमधून रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा होईल का आमदार?

रिवाबा जडेजा
रिवाबा जडेजा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gujrat Election Result 2022 : क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत. उत्तर जामनगर विधानसभा मतदार संघातून भाजपकडून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे रिवाबा यांच्या विरोधात तिचे सासरे आणि नणंद नयनाबा जडेजाने यांनीच प्रचार केला होता. इतकचं नाही तर काँग्रेस उमेदवार बिपिन जडेजांना मते देण्यासाठी जनतेला आवाहन केले होते. त्यामुळे या जागेपेक्षा कौटुंबिक मतभेद अधिक चर्चेत राहिले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यात तिहेरी सामना आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा चर्चेत आहे.

Gujrat Election Result 2022 : रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगर उत्तर मतदार संघातून भाजपकडून रिंगणात आहेत. रिवाबा यांच्याविरोधात काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा निवडणूक लढत आहेत. तर आपकडून करशनभाई करमूर आहेत. आता रिवाबा जडेजा या आमदार होतील की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

जामनगर उत्तर भाजपची पारंपरिक सीट मानली जाते. २०१७ मध्ये भाजपकडून धर्मेंद्र सिंह जडेजा आमदार झाले होते. पण, यंदा भाजपने रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना संधी दिली आहे.

Gujrat Election Result 2022 : रिवाबा जडेजा यांच्याविषयी…

रिवाबा यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. २०१६ मध्ये त्यांचे रवींद्र जडेजा यांच्याशी लग्न झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी रिवाबा यांनी भाजपचा हात धरला होता. तीन वर्षांनी भाजपने त्यांना जामनगर उत्तरमधून उमेदवारी दिली. रवींद्र जाडेजानेदेखील जनतेकडे आपल्या पत्नीच्या समर्थनार्थ मते मागितली होती.

Gujrat Election Result 2022 : एकाच कुटुंबातील मतभेद

रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजा यांनी प्रचारावेळी आपली वहिनी रिवाबा विरोधात अनेक आरोप केले होते. नयनाबाने रिवाबावर आरोप केले होते की, प्रचारासाठी ती मुलांचा उपयोग करत आहे.

नयनाबाने म्हटले होते की, हे एका प्रकारे बालश्रम आहे. काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. नयनाबा यांच्या मतानुसार, रिवाबा निवडणुकीमध्ये मुलांचा उपयोग सहानुभूती मिळवण्यासाठी करत आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news