हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

बिरदेव मंदिराच्या जीर्णोदारासाठी माझा हातभार लागला हेच माझं भाग्य : हसन मुश्रीफ

Published on

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरगूड येथील बिरदेव मंदिराच्या जिर्णोदरासाठी माझा हातभार लागला हे माझ्या जीवनातील भाग्य समजतो. सध्या बिरदेव मंदिरासाठी एक कोटी व नंतरच्या टप्प्यात एक कोटी असा दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या

कळस बांधकाम करण्यासाठी शासनाचा निधी नसल्यामुळे वैयक्तिक माझ्याकडून व समाजाकडून लागणारा निधी संकलित करून बिरदेव मंदिराचा तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकास करू असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मुरगूड ( ता.कागल ) येथील बिरदेव मंदिर भेटी व पाहणी प्रसंगी हसन मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील होते. जांभुळखोरा ते बिरदेव मंदिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात वाजत- गाजत मिरवणुकीने मुश्रीफ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. यावेळी या मंदिराच्या जिर्णोदरासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुश्रीफ यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

स्वागत आप्पासो मेटकर यांनी तर प्रास्ताविक जगन्नाथ पुजारी यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे भाषण झाले. यावेळी युवा नेते दिग्विजय पाटील, सातापा मेटकर, आकाराम मेटकर, तुकाराम पुजारी, पांडुरंग पुजारी, प्रशांत मेटकर, महेश मेटकर, महादेव हजारे उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान मेटकर तर आभार संदीप पुजारी यांनी मानले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news