Greg Chappell On Virat : विराटबाबत चॅपेल यांचे मोठे विधान; म्हणाले, परमेश्वराचे…

Greg Chappell On Virat
Greg Chappell On Virat
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ५३ चेंडूमध्ये ८२ धावांची दमदार खेळी केली. त्‍याच्‍या या अविस्‍मरणीय खेळीमुळे भारताला दिमाखदार विजय मिळाला.   अनेकांकडून त्याच्या या खेळीचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी विराटच्या या खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे. मी पाहिलेल्या काळातील विराट कोहली याची ही सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचे ग्रेग चॅपेल म्हणाले. (Greg Chappell On Virat)

हा खेळ 'परमेश्वराचे गीत' होते…

ग्रेग चॅपेल म्हणाले, "विराटची पाकिस्तानविरुद्धची खेळी म्हणजे 'परमेश्वराचे गीत' होते. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात विराटच्या खेळीने प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्‍या संघाला ज्यापद्धतीने नमवले. ते आजवर कोणत्याही माजी फलंदाजाला जमले नाही. चॅपेल 'सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड'मध्ये लिहतात, "मी पाहिलेल्या कार्यकाळातील विराट हा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. केवळ महान खेळाडूंमध्येच शेवटपर्यंत झुंज देत सामना खेचून आणण्याचे धैर्य असते. कोहलीने पाकविरुद्धच्या सामन्यात खऱ्या अर्थाने हे धैर्य दाखवले. (Greg Chappell On Virat)

विराटची खेळी ही टीम इंडियाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्‍यासारखी असल्‍याचे चॅपेल यांनी म्‍हटलं आहे. विराटच्या या खेळीमध्ये फलंदाजीची खरी कला पहायला मिळाली. आजवर हे कोणीही करू शकलेले नाही. विराटच्या या खेळीने टी-२० क्रिकेटला अधिक पारदर्शी  बनवले आहे. यापुढे कोणीही टी-२० क्रिकेटला मनोरंजन म्हणून पाहणार नाही, असेह चॅपेल यांनी म्‍हटलं आहे.  (Greg Chappell On Virat)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news