Greece boat tragedy | ग्रीस बोट दुर्घटनेत ३०० पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू

Greece Boat Incident
Greece Boat Incident

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण ग्रीसच्या समुद्र तटावर शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याची दुर्घटना बुधवारी (दि.१४) घडली. यात जवळपास ३०० पाकिस्तानी लोकांचा मृत्यू झाला असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. बोट बुडण्याची कारणे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर पाकिस्तान अधिकाऱ्यांनी रविवारी 10 कथित मानवी तस्करांना अटक केली आहे. या बोट दुर्घटनेच्या र्पाश्वभूमीवर आज (दि.१९) पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी. (Greece boat tragedy)

माहितीनुसार, दरवर्षी, हजारोच्या संख्येने पाकिस्तानी तरुण चांगल्या जीवनाच्या शोधात बेकायदेशीरपणे युरोपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत धोकादायक प्रवास करत असतात. प्रामुख्याने पूर्व पंजाब आणि वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतातील तरुण युरोपमध्ये प्रवेश करण्यासाठी इराण, लिबिया, तुर्की आणि ग्रीसमधून वाहतुकीचे मार्गाचा वापर करतात. दरम्यान, ग्रीसजवळ भूमध्य समुद्रात एक बोट बुडली असून यात  सुमारे ७५० नागरिक होते. बोटीवर प्रामुख्याने पाकिस्तानचे नागरिक होते. हे नागरिक पाकिस्तानमधील बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे त्रस्त होऊन ग्रीसमध्ये स्थलांतर करत होते. पण ग्रीसमध्ये जाऊन नशीब आजमावण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. बोट बुडली आणि शेकडो नागरिकांचा बुडून मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. यात ३०० पाकिस्तानी लोकांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 10 संशयित मानवी तस्करांना अटक करण्यात आली आहे. यापैकी नऊ जणांना पाकव्याप्त काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आले आणि एकाला गुजरातमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक अधिकारी चौधरी शौकत म्हणाले, "सध्या या तस्करांची चौकशी सुरु आहे.

Greece boat tragedy : सोमवार राष्ट्रीय शोक दिवस

सोमवार हा राष्ट्रीय शोक दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी लोकांच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या एजंटांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आणि त्यांना कठोर शिक्षा केली जाईल असे सांगितले आहे.

बोटीतील सर्व प्रवासी 'मायग्रेंट'

माध्यमांच्या माहितीनुसार, बोटीतील प्रवासी हे पाकिस्तान, सीरिया आणि लीबिया येथील स्थलांतरित होते. अशा प्रकारे पश्चिमी देशात जाण्यासाठी अनेक वेळा लोक बोटीतून प्रवास करतात. अनेकदा अशा प्रकारच्या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोकांनी प्रवास केल्याने बोट बुडल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळीही देखील बोट बुडण्याचे हेच कारण असल्याचे समजते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news