पहिल्या ई-एसटी बसचे नगरमध्ये जंगी स्वागत

पहिल्या ई-एसटी बसचे नगरमध्ये जंगी स्वागत

नगर : पुढारी वृत्तसेवा

पुण्याहून नगरच्या दिशेने पहिली ई-एसटी बस धावली आणि या बसचे चंदन, नगर, शिक्रापूर, शिरूर, सुपा, नगर येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

राज्यामध्ये पहिली एसटी बस नगर ते पुणे अशी धावली होती. त्याच धर्तीवर बुधवारी (दि.1) पहिल्यांदा शिवाई ई एसटी बस नगर पुणे ते नगर धावली. या बसचे नगरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. या बससाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारामध्येच तात्पुरत्या स्वरूपात चार्जिंग पॉइंट तयार करण्यात आला आहे, त्या चार्जिंग पॉईंटवर आज पहिल्यांदा ती चार्ज करण्यात आली.

चालक संतोष राठोड यांना मान

एसटीचे चालक संतोष राठोड यांनी पुण्याहून नगरला ई-एसटी बस चालवत आणली. ही शिवाई ई- एसटी बस चालविण्याचा पहिला मान त्यांना मिळाला.

ई बस अन्य बसपेक्षा खूप आरामदायी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम आहे. चालकाचे दुर्लक्ष झाल्यास ई-एसटी बसमधील सायरन वाजतात. ही एक महत्त्वाची बाब बसमध्ये आहे.

                                                                   – संतोष राठोड, चालक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news