सरकारकडे भविष्याचा रोडमॅप नाही – राहुल गांधी

सरकारकडे भविष्याचा रोडमॅप नाही – राहुल गांधी

पुढारी ऑनलाईन: भारताचे भविष्य घडविण्यासाठी सरकारकडे कोणताही रोडमॅप नसल्याचे या अर्थसंकल्पावरून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर दिली आहे. काल बुधवारी त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ट्विट शेअर केले. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारकडे भविष्य घडविण्यासाठी कोणताही रोडमॅप नाही, असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीसाठी कोणतीही दृष्टी नाही. महागाईला तोंड देण्यासाठी कोणतीही योजना नाही. तसेच या अर्थसंकल्पात विषमता दूर करण्याचा हेतू नसल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे. देशात सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांकडे 40 टक्के संपत्ती आहे. 50 टक्के गरीब लोक 64 टक्के जीएसटी भरतात, 42 टक्के तरुण बेरोजगार आहेत. यानंतरही पंतप्रधानांना त्याची पर्वा नाही. भारताचे भविष्य घडवण्यासाठी सरकारकडे रोडमॅप नाही हे या अर्थसंकल्पाने सिद्ध केले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news