Shaktikanta Das: शक्तीकांत दास यांना ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्कार; लंडन सेंट्रल बँकिंगकडून सन्मान

Shaktikanta Das: शक्तीकांत दास यांना ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्कार; लंडन सेंट्रल बँकिंगकडून सन्मान

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांना 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार लंडन सेंट्रल बँकिंगच्या वतीने देण्यात आला आहे.

शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अलीकडेच त्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या काळातही त्यांनी महागाईचा सामना करण्यासाठी अतिशय प्रशंसनीय भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या संकटातही त्यांनी बँकांना काही महिन्यांसाठी ईएमआयमध्ये सूट देण्याच्या सूचना केल्या होत्या.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news