संसद भवन संकुलाची ‘सर्वसमावेशक’ सुरक्षा ‘सीआयएसएफ’कडे

संसद भवन संकुलाची ‘सर्वसमावेशक’ सुरक्षा ‘सीआयएसएफ’कडे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकत्‍याच संसदेत झालेल्‍या घुसखोरीच्‍या प्रकाराची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली आहे. आता संसद भवन संकुलाची 'सर्वसमावेशक' सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (CISF) सोपवण्याचा निर्णय घेतला असल्‍याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. ( Parliament complex security )

नवी दिल्ली, 21 डिसेंबर (पीटीआय) नुकत्याच झालेल्या सुरक्षा कक्षाच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संसद भवन संकुलाची "सर्वसमावेशक" सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी गुरुवारी दिली. .

'सीआयएसएफ' हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. या दलाकडे सध्या दिल्लीतील अनेक केंद्र सरकारच्या मंत्रालयाच्या इमारतींचे संरक्षणाची जबाबदारी आहे. तसेच नागरी विमानतळच्‍या सुरक्षेची जबाबदारी या दलाकडे आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी संसद भवन संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. संसद सुरक्षा सेवा (PSS), दिल्ली पोलीस आणि संसद कर्तव्य गट (PDG) चे विद्यमान घटक देखील असलेल्या CISF च्या सर्वसमावेशक सुरक्षा कवचाखाली नवीन आणि जुने संसद परिसर आणि त्यांच्या संलग्न इमारती आणल्या जातील, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

बुधवार, १३ डिसेंबर रोजी सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन तरुणांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारली होती. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिना दिवशी झालेल्‍या धक्‍कादायक प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. याच वेळी अमोल शिंदे आणि नीलम देवी या दोघांनीसं सदेच्या आवाराबाहेर "तानाशाही नही चलेगी" अशी घोषणा देत  धूराची कांडी फाेडली. पाचवा आरोपी ललित झा याने कथितरित्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. आज (दि.२१ ) कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधून आणखी दाेघा तरुणांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. साईकृष्‍ण कर्नाटक आणि  अतुल कुलश्रेष्‍ठ ( उत्तर प्रदेश)  अशी त्‍यांची नावे आहेत. साईकृष्‍ण हा निवृत्त पाेलीस अधिकार्‍याचा मुलगा असल्‍याचे पाेलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news