Jagdeep Dhankhar Mimicry : जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणी भाजपकडून राहुल गांधींचा निषेध

Jagdeep Dhankhar Mimicry : जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणी भाजपकडून राहुल गांधींचा निषेध

पणजी; पुढारी वृत्तसेवा : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री (Jagdeep Dhankhar Mimicry) करण्याच्या घटनेत सहभागी होऊन मिमिक्रीचा व्हिडीओ केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने आज (दि.२१) पणजी येथे कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा निषेध करत प्रतिकात्मक पुतळा जाळला. 'उपराष्ट्रपतींचा अपमान नही सहेगा हिंदुस्थान' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, पर्यटनमंत्री रोहण खंवटे, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांद्रेकर, महिला मोर्चा अध्यक्ष आरती बांदोडकर व भाजप नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपतींची नक्कल करून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी व त्या नक्कलेचा व्हिडिओ करून राहुल गांधी यांनी उपराष्ट्रपतींचाच नव्हे तर लोकशाहीचा तसेच भारतीयांचा अपमान केला आहे, असे यावेळी खंवटे म्हणाले. (Jagdeep Dhankhar Mimicry)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news