Rohit Pawar Tweet : “सरकारचं आता अति होतंय!” रोहित पवारांची सरकारवर टीका

Rohit  Pawar Tweet : “सरकारचं आता अति होतंय!” रोहित पवारांची सरकारवर टीका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रसे नेते, आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar Tweet) शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आज सकाळी केलेलं, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. हे ट्विट रिट्विट करत लिहलं आहे की, "एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकीय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?" वाचा नेमकं काय आहे प्रकरण.

जितेंद्र आव्हाड : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय

आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी एक ट्विट केले होते की, " पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हे दाखल केले आणि तो ही ३५४ चा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही". जितेंद्र आव्हाडांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावरुन सर्वपक्षीय संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Jitendra Awhad : काय आहे नेमकं प्रकरण

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी अटक दिनांक ११ नोव्हेंबरला केली होती. त्यावेळी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला होता. या प्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची १२ नोव्हेंबरला जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या महिना भरातील जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हा दुसरा गुन्हा आहे.

ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम 13 नोव्हेंबर 2022 रोजी झाला होता. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. या कार्यक्रमात आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. ही भाजपची पदाधिकारी आहे. तक्रारदार महिला सदर कार्यक्रमा वेळी या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी मला चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला.  त्यानंतर त्या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Rohit Pawar Tweet : सत्याचा आवाज दाबता येत नाही 

आमदार रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आज सकाळी केलेला ट्विटला रिट्विट करत लिहलं आहे की, "एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकीय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?" तर या ट्विटपूर्वी त्यांनी जितेंद्र आव्हाडांना टॅग करत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारजी वाजपेयी यांच्या ओळी लिहित ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, "'छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता', स्व. अटलजींच्या या ओळी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच लक्षात घेतील." या ट्विटमध्ये त्यांनी राजीनामा नको लढू आणि जिंकू!

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news