Google : लहान मुलं काय पाहणार; त्यावर गुगलचं लक्ष राहणार!  

Google : लहान मुलं काय पाहणार; त्यावर गुगलचं लक्ष राहणार!  
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : १८ वर्षांहून कमी वयोगटातील युजर्ससाठी येत्या काही महिन्यांत गुगल (Google) अनेक बदल करणार आहे. हे बदल गुगल अकाउंट्सबाबत आहेत. यातून लहान मुलांना ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवलं जाण्याचा प्रयत्न होणार आहे.

मुलांकडून मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जात आहे, त्यामुळे पालक काळजीत आहेत. त्यामुळे गुगलच्या या निर्णयामुळे आता पालकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. टेक कंपनी गुगलने बुधवारी आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली.

कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कंपनीकडून १८ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी लिंगाच्या आधारे जाहिरातींवर रोख लावण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर हे अपडेट रोल आउट करण्यास सुरू करणार आहे. गुगलवर (Google) जाहिरातींसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करणं हेच लक्ष्य आहे, तसेच वयानुसार जाहिराती दाखवण्यात येणार आहेत.

नियमा असे सांगतात की, १३ वर्षांखालील मुले एक स्टँडर्ड गुगल (Google) अकाउंट तयार करू शकणार नाहीत. त्यांना मर्यादीत फीचर्ससह गुगल अकाउंट वापरण्याची सूट मिळेल. उदाहरणार्थ आता १३ ते १७ वर्ष वयोगटातील मुले YouTube डिफॉल्ट अपलोडचा वापर करू शकतात.

गुगल (Google) कडून मुलांच्या सेफ्टीसाठी सेफ सर्च नावाचे फीचर आणणार आहे. यात मुलांचे गुगल अकाउंट कुटुंबियांसह लिंक असेल, ज्यात १३ वर्ष वयोगटातील मुले साइन-इन करू शकतील. ते काय सर्च करतात, याची नेमकी माहिती पालकांनाही मिळत राहणार आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुगलने केलेले बदल महत्वपूर्ण आहे.

पहा व्हिडीओ : राष्ट्रीय चरित्र घडवण्यासाठी आजही शिवचरित्र आवश्यक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news