पुढारी ऑनलाईन : आर्थिक मंदीमुळे दिग्गज कंपन्यांकडून नोकरकपात सुरुच आहे. आता टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल (Google) ने त्याच्या Waze मॅपिंग सर्व्हिसमधील नोकऱ्यांमध्ये कपात सुरू केली आहे. कारण ते स्वतःच्या मॅप प्रोडक्ट्स युनिटचे एकत्रीकरण करत आहेत. Geo नावाच्या Google च्या मॅप्स विभागाचे प्रमुख ख्रिस फिलिप्स यांनी मंगळवारी कर्मचार्यांना Waze च्या जाहिरातींच्या कमाई धोरणात्मक बदलाबद्दल माहिती दिली. (Google Layoffs)
या कंपनीने Waze च्या जाहिरातींचे व्यवस्थापन ग्लोबल बिझनेस ऑर्गनायझेशन (GBO) मध्ये हस्तांतरित करण्याची आणि Google मॅप्ससह संरेखित करण्याची योजना आखली आहे. परिणामी Waze जाहिरातींच्या कमाईशी संबंधित विक्री, मार्केटिंग, ऑपरेशन्सची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे.
"Waze जाहिरातदारांसाठी एक चांगला, अधिक अखंड दीर्घकालीन अनुभव निर्माण करण्यासाठी आम्ही Waze ची विद्यमान जाहिरात प्रणाली Google Ads तंत्रज्ञानामध्ये बदलण्यास सुरुवात केली आहे. या अपडेटचा भाग म्हणून आम्ही Waze जाहिरातींच्या कमाईशी संबंधित नोकऱ्या कमी केल्या आहेत, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने Google ने दिलेल्या माहितीच्या आधारावर दिले आहे.
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी या बदलाची माहिती बुधवारी जाहिरातदार आणि भागीदारांना देणार आहे. यासंदर्भातील एका ई-मेलमध्ये नेमकी किती नोकरकपात केली जाईल याचा तपशील उघड केलेला नाही. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की वेझ युनिटमध्ये सध्या ५०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. Google ने २०२३ मध्ये सुमारे १.३ अब्ज डॉलरमध्ये Waze चा ताबा घेतला होता.
Google ची पेरेंट कंपनी Alphabet ने जानेवारीत जाहीर केले होते की, ते १२ हजार कर्मचार्यांना काढून टाकतील. ही नोकरकपात त्यांच्या कर्मचार्यांच्या ६ टक्के एवढी आहे. कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर कार्यक्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून काही प्रोजेक्ट्स बंद केले होते.
Waze अॅप यूजर्संना वाहतूक मार्ग आणि रिअल-टाइम रहदारीची माहिती देण्यासाठी क्राउडसोर्सिंगचा वापर करते. याचे सुमारे १४० दशलक्ष सक्रिय यूजर्स आहेत. (Waze mapping service)
हे ही वाचा :