INDvsEND Semi Final : भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनलमध्ये पावसाचा अडथळा…

INDvsEND Semi Final : भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनलमध्ये पावसाचा अडथळा…

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsEND Semi Final : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. आता दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरुवारी (दि. 10) भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हलवर हा शानदार सामना रंगणार असून हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. तर सामन्याचा टॉस 1 वाजता होईल.

टी 20 विश्वचषक स्पर्धेतील अनेक सामन्यांवर पावसाने आपला प्रभाव दाखवला आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडेल की नाही, याची चिंता आहे. मात्र अशात एक मोठी अपडेट समोर येत आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की, गुरुवारी होणाऱ्या सामन्यादरम्यान अॅडलेडमध्ये पावसाची शक्यता नाही. Weather.com च्या माहितीनुसार, अॅडलेडमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असेल, सकाळच्या सुरुवातीचे काही तास 24 टक्के पाऊस अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामना सुरू होईल त्यावेळी हवामान अगदी स्वच्छ असेल आणि उद्या 20-20 षटकांचा पूर्ण सामना खेळला जाण्याची शक्यता आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की पावसामुळे दोन्ही देशांमधील हा सामना नियोजित दिवशी आणि राखीव दिवशी खेळला गेला नाही, तर अशा परिस्थितीत भारतीय संघाला विजयी घोषित केले जाईल. यानंतर आपसुकच रोहित ब्रिगेड अंतिम फेरीत पोहोचेल.

टी 20 मध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आतापर्यंत 22 वेळा एकमेकांसमोर खेळले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 12 आणि इंग्लंडने 10 सामने जिंकले आहेत. पण उद्या होणारा सामना हा विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना आहे, ज्याचे दडपण दोन्ही संघांवर असेल. जो संघ हे दडपण चांगल्या प्रकारे आत्मसात करेल तो विजय मिळवेल हे निश्चित.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

इंग्लंड संघ :

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news