पुढारी ऑनलाईन : ऑस्करनंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब २०२४ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. गोल्डन ग्लोब २०२४ मध्ये 'ओपनहायमर' चित्रपटाने बाजी मारली आहे. हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फी याने 'ओपेनहायमर' या बायोपिक चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता म्हणून गोल्डन ग्लोब जिंकला आहे. तर रॉबर्ट डाउनी ज्युनियरने 'ओपनहायमर'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे. गोल्डन ग्लोबच्या ८१ व्या आवृत्तीचा वितरण सोहळा कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्समधील बेव्हरली हिल्टन हॉटेलध्ये होत आहे. (Golden Globe Awards 2024)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार 'ओपनहायमर'साठी ख्रिस्तोफर नोलन यांना देण्यात आला आहे. बेस्ट ओरिजिनल स्कोअरसाठीचा गोल्डन ग्लोब लुडविग गोरानसन यांना 'ओपेनहायमर'साठी मिळाला. सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा मोशन पिक्चर किलर्स ऑफ द फ्लॉवर मूनमधील भूमिकेसाठी लिली ग्लॅडस्टोनला मिळाला. कॉमेडी/म्युझिकलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार 'पुअर थिंग्ज'साठी एम्मा स्टोनला देण्यात आला.
सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंटचा पुरस्कार 'बार्बी'ने जिंकला. बेस्ट ओरिजिनल साँगचा गोल्डन ग्लोब पुरस्कार 'बार्बी' मधील 'व्हॉट वॉज आय मेड फॉर'साठी बिली इलिशला मिळाला.
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपटाचा गोल्डन ग्लोब 'द बॉय अँड द हेरॉन'ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मोशन पिक्चर म्युझिकल/कॉमेडी 'द होल्डोव्हर्स' मधील अभिनयासाठी पॉल गियामट्टी याला देण्यात आला. (Golden Globe Awards 2024)
बेस्ट ड्रामा सीरीजचा पुरस्कार 'सेक्सेशन'ने जिंकला आहे. सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन महिला अभिनेत्रीचा गोल्डन ग्लोब ड्रामा सिरीज सारा स्नूकला तिच्या 'सक्सेशन'मधील भूमिकेसाठी मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा – ओपनहायमर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ख्रिस्तोफर नोलन (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता- सिलियन मर्फी (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री- रॉबर्ट डाउनी ज्युनियर (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा – लिली ग्लॅडस्टोन (किलर्स ऑफ द फ्लॉवर मून)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – म्युझिक किंवा कॉमेडी- (पुअर थिंग्ज)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – म्युझिक किंवा कॉमेडी- पॉल गियामट्टी (द होल्डओव्हर्स)
सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका – ड्रामा- सक्सेशन
टीव्ही मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ड्रामा- सारा स्नूक (सक्सेशन)
बेस्ट ओरिजिनल साँग- व्हॉट वॉज आय मेड फॉर? ( बिली इलिश आणि फिनीस (बार्बी)
हे ही वाचा :