पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि अभिनेता रणवीर सिंग हे एक लोकप्रिय कपल आहे. दोघांनीही बॉलीवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. २०१८ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत; पण त्यांना अजूनही कोणतेही अपत्य नाही, हे विशेष!. आता दीपिकाने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती लवकरच गुड न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे. कुटुंब नियोजनावर ती व्यक्त झाली आहे.
संबंधित बातम्या
एका मुलाखतीत दीपिका म्हणाली की, आम्हा दोघांना लहान मुले खूप आवडतात. आम्हीही त्या दिवसाची वाट पाहत आहोत. त्यावेळी आमचे कुटुंब सुरू होईल. माझे नातेवाईक, मित्रपरिवार नेहमी म्हणतात की, माझ्यात जराही बदल झालेला नाही. हे माझ्यावरील संस्कारांमुळेच. सिनेसृष्टीत पैसे आणि प्रसिद्धीमुळे प्रभावित होणे सोपे आहे; पण घरात कोणीही मला सेलिब्रिटीसारखे वागवत नाहीत. मी सर्वात आधी मुलगी आणि बहीण आहे. रणवीर आणि मला ही आशा आहे की, आमच्या मुलाला लवकरच जन्माला घालू! असेही तिने म्हटलं आहे.