Gold rate today | अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी महागली, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

Gold rate today
Gold rate today

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शुक्रवारी (दि.१०) सोने- चांदीत दरात वाढ झाली. शुद्ध सोने (२४ कॅरेट) प्रति १० ग्रॅममागे १,१३१ रुपयांनी महागले. तर चांदीच्या दरात दर प्रति किलोमागे १,८१० रुपयांनी वाढ झाली आहे. शुद्ध सोन्याचा (Gold rate today) दर आज प्रति १० ग्रॅम ७२,६३३ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८४,१५२ रुपयांवर खुला झाला आहे. चांदीच्या दराचा हा सर्वकालीन उच्चांक आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७२,६३३ रुपये, २२ कॅरेट ६६,५३२ रुपये, १८ कॅरेट ५४,४७५ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४२,४९० रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८४,१५२ रुपयांवर खुला झाला आहे.

अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी सोने खरेदी केली जाते.

सोन्याच्या किमतीत वर्षभरात १४ टक्क्यांची वाढ

अक्षय्य तृतीयेला MCX वर जून फ्युचर्स सोने दराने ७२ हजारांचा टप्पा ओलांडला. एमसीएक्सवर सोन्याचा दर ०.६२ टक्के वाढीसह प्रति १० ग्रॅम ७२,०८१ रुपयांवर पोहोचला. मध्य पूर्वेतील सुरु असलेल्या भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यवधीत सोन्याचा दर खाली आला होता. पण त्यात आता पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या किमतीत वर्षभरात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold Price Today)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news