Gold prices today | लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांना झटका, दरात मोठा बदल, जाणून घ्या नवे दर

Gold rate today
Gold rate today

Gold prices today : लग्नसराईत सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना झटका बसला आहे. कारण आज गुरुवारी (दि. १ डिसेंबर) सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर ३४३ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ५३,१२० रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर १,७८३ रुपयांनी वाढून प्रति किलो ६३,६८३ रुपयांवर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी केलेले सरासरी दर असतात. जीएसटीविना हे दर दिलेले असतात. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटी आणि घडणावळ खर्च धरला तर प्रत्यक्षात प्रति १० ग्रॅम ५४,७०० रुपयांवर पोहोचला आहे. २४ कॅरेट सोन्यात ९९.९९ टक्के सोने असते. २३ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह धरला तर ५४,४०० रुपयांवर आहे. यात ९५ टक्के सोने असते.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५३,१२० रुपये, २३ कॅरेट ५२,९०७ रुपये, २२ कॅरेट ४८,६५८ रुपये, १८ कॅरेट ३९,८४० रुपये, १४ कॅरेटचा दर ३१,०७५ रुपयांवर खुला झाला आहे. (Gold prices today)
२२ कॅरेट सोन्याची खरेदी जीएसटी धरून प्रति १० ग्रॅम ५० हजार रुपयांना पडते. २२ कॅरेट सोन्यात ८५ टक्के सोने असते. यात दागिने बनविले जातात. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर वाढीची गती कमी करण्याचे संकेत दिल्यानंतर सोन्याचे भाव गुरुवारी दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. तर जागतिक स्तरावर डॉलर घसरला आहे.

मल्टिकमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोने फ्यूचर्स ०.६२ टक्क्यांनी म्हणजेच ३३० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ५३,२६१ रुपयांवर व्यवहार करत होते. तर चांदीचा दर २ टक्क्यांनी म्हणजेच १२०४ रुपयांनी वाढून प्रति किलो ६४,६६५ रुपयांवर गेला आहे. सोन्याच्या स्पॉट किमती गेल्या तीन आठवड्यांत १,३०० रुपयांनी वाढल्या आहेत. या कालावधीत चांदीचे दर स्थिर होते. पण आता तेही वाढले आहेत.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news