Gold prices : सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे कल, दराने गाठला उच्चांक!

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

रशिया-युक्रेन युद्धामुळे जोखीम वाढली आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन मालमत्ता) म्हणून सोन्यात गुंतवणूक (Gold prices) वाढली आहे. यामुळे सोन्याच्या दराने उच्चांक गाठलाय. सोमवारी सोन्याच्या किमती मार्चच्या मध्यानंतर पहिल्यांदाच उच्चांकी पातळीवर पोहोचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात (Spot gold) ०.५ टक्के वाढ होऊन ते प्रति औंस १,९८४ डॉलरवर पोहोचले आहे.  दरम्यान, भारतीय सराफा बजारातही सोन्याच्या दरात तेजी आली आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुद्ध सोने (Gold prices) म्हणजे २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५३,५९० रुपयांवर पोहोचले आहे. २३ कॅरेट सोने ५३,३७५ रुपये, २२ कॅरेट ४९,०८८ रुपये, १८ कॅरेट ४०,१९३ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३१,३५० रुपयांवर पोहोचला आहे. चांदी प्रति किलो ६९,९१० रुपयांवर गेली आहे.

याआधी १३ एप्रिल शुद्ध सोन्याचा भाव ५३,२२० रुपयांवर जाऊन बंद झाला होता. आज सोमवारी बाजार खुला होताच सोन्याचा दर ५३ हजार रुपयांवर खुला झाला. चांदीही महागली आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news