Gold Price Today | सोने- चांदी दरात उसळी! जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today | सोने- चांदी दरात उसळी! जाणून घ्या आजचे दर

पुढारी ऑनलाईन : आज सराफा बाजारात सोन्याच्या दराने ६१,५०० रुपयांचा टप्पा पार केला. आज गुरुवारी शुद्ध सोन्याचा दर (24 Carat Gold) ५२१ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ६१,५६५ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर १,०७७ रुपयांनी वाढून प्रति किलो ७६,३५९ रुपयांवर पोहोचला आहे. सध्याचा सोन्याचा दर पाहता सोने लवकरच ६२ हजार रुपयांवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Gold Price Today)

काल बुधवारी शुद्ध सोन्याचा दर ६१,०४४ रुपयांवर बंद झाला होता. आज सोने ५२१ रुपयांनी वाढून ६१,५६५ रुपयांवर व्यवहार करत आहे. २२ कॅरेट सोन्यात दागिने बनविले जातात. या २२ कॅरेटचा (22 Carat Gold) दर ४७७ रुपयांनी वाढून ५६,३९३ रुपयांवर व्यवहार करत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज गुरुवारी (Gold Price Today) २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६१,५५६ रुपये, २३ कॅरेट ६१,३१९ रुपये, २२ कॅरेट ५६,३९३ रुपये, १८ कॅरेट ४६,१७३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३६,०१५ रुपयांवर खुला झाला आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news