Gold Price Today | सोने-चांदी दरात मोठा बदल, जाणून घ्या नवे दर

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज गुरुवारी शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर ३६७ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ५८,४७६ रुपयांवर आला. काल बुधवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,८४३ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ७०,१६० रुपये रुपयांवर होता. आज चांदी ३२० रुपयांनी स्वस्त होऊन दर प्रति किलो ७० हजारांच्या खाली आला. (Gold Price Today)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,४७६ रुपये, २३ कॅरेट ५८,२४२ रुपये, २२ कॅरेट ५३,५६४ रुपये, १८ कॅरेट ४३,८५७ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३४,२०९ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा प्रति किलो दर ६९,८४० रुपयांवर खुला झाला आहे.

एमसीएक्सवर सोने घसरले

गुरुवारी एमसीएक्सवर (MCX) सोने- चांदीचे दर घसरले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, सोने ऑक्टोबर फ्युचर्सचा दर २१३ रुपयांनी म्हणजेच ०.३६ टक्के कमी होऊन तो प्रति १० ग्रॅम ५८,४६८ रुपयांवर ​​आला. एमसीएक्सवर चांदीचा सप्टेंबर फ्युचर्सचा दर १८० रुपयांनी घसरून प्रति किलो ६९,५४२ रुपयांवर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने निच्चांकी पातळीवर

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह पतधोरणविषयक कडक धोरण राबवणार असल्याच्या शक्यतेने सोन्याच्या किमती गुरुवारी पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आल्या. स्पॉट सोन्याची किंमत प्रति औंस १,८९१ डॉलर पर्यंत खाल्या आल्या आहेत. १५ मार्च नंतर पहिल्यांदाच सोन्याची किंमत निच्चांकी पातळीवर आली. यूएस गोल्ड फ्युचर्सचा दर ०.३ टक्के कमी होऊन १,९२१ डॉलरवर आला. (Gold Price Today)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news