Gold Price Today | सोने-चांदी दरात बदल, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today | सोने-चांदी दरात बदल, जाणून घ्या आजचे दर

पुढारी ऑनलाईन : आज सोन्याच्या दरात किचिंत वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ०.१९ टक्के वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX), सोन्याचा जून फ्युचर्स दर ०.१८ टक्के वाढून प्रति १० ग्रॅम ६०,७८० रुपयांवर गेला आहे. एमसीएक्सवर चांदीचा मे फ्युचर्स दर किचिंत वाढून प्रति किलो ७६,४४४ रुपयांवर आहे. (Gold Price Today)

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, काल मंगळवारी २४ कॅरेटचा दर (24ct gold price today) प्रति १० ग्रॅम ६०,४१७ रुपयांवर बंद झाला होता. २३ कॅरेट सोन्याचा दर ६०,१७६ रुपये, २२ कॅरेट (gold rate today 22k) ५५,३४२ रुपये, १८ कॅरेट ४५,३१२ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३५,३४३ रुपयांवर होता. तर चांदीचा दर प्रति किलो ७४,२२६ रुपये होता. (gold and silver price today)

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापूर्वी चलनविषयक धोरणाबाबत अनिश्चिततेमुळे जागतिक स्तरावर बुधवारी सोन्याचे दर प्रति औंस २ हजार डॉलरच्या पातळीच्या वर राहिले आहेत.

'या' गोष्टी सोन्याच्या किमती वाढण्यास कारणीभूत

यंदाच्या वर्षात देशातील सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून आला. २०२२ पासून सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या दरात सुमारे ३ हजार रुपयांची वाढ झाली. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेकडून होत असलेली व्याजदरवाढ आणि महागाई या सर्व गोष्टी सोन्याच्या किमती वाढण्यास कारणीभूत आहेत. सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news